Skymet weather

[Marathi] या सप्ताहाअखेरपर्यंत मराठवाड्यात चांगला पाऊस

September 4, 2015 12:22 PM |

 

Marathwada Rainsयंदा जून महिन्यात मराठवाड्यात सरासरीपेक्षा १७% च कमी परंतु चांगलाच पाऊस झाला. त्याचबरोबर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाची कमतरता वाढून ती अनुक्रमे ५६% आणि ५२% एव्हडी झाली.

सर्वसाधारणपणे मान्सूनचा पाऊस जरी सामान्य झाला तरी मराठवाडा हा एक असा भाग आहे कि तेथे नेहमीच पावसाची कमतरता असते. यालाही कारण या भागाची असलेली भौगोलिक परिस्थितीच आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या हवामान प्रणालींचा प्रभाव हा प्रामुख्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टीला, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशाला होत असतो. तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालींचा प्रभाव हा आग्नेय दिशेकडील भागात सरकत असतो, तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि विदर्भ या भागांवर होताना दिसतो.

परंतु सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव हा उत्तर कर्नाटकातील भागापासून ते तामिळनाडूहून पुढे मन्नारच्या आखतापर्यंत होतो आहे. तसेच या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांवर होईल असा अंदाज आहे.

या सर्व परिस्थितीचा परीणाम म्हणजे येत्या २४ ते ४८ तासात मराठवाड्यात हलक्या ते तुरळक स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. तसेच या पावसाचा जोर हळूहळू वाढत जाईल. परंतु या आठवड्याच्या शेवटी मराठवाड्यात चांगलाच पाऊस होईल आणि त्यामुळे या भागातील पावसाची कमतरता थोड्याफार प्रमाणात कमी होईल.

तसेच या पावसाचा खरिपाच्या पिकांसाठी जरी फारसा उपयोग नसला तरी स्कायमेट या संस्थेने या आधीही सांगितल्या नुसार या वर्षी जरी पाऊस कमी झाला असला तरी पिकांच्या आणि कृषिक्षेत्राच्या दृष्टीने पुरेसा आणि व्यापक पाऊस झाला असल्याने पिकांचे फारसे नुकसान झालेले नाही.

Image Credit: Yanidel.net

 

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try