Skymet weather

[MARATHI] मराठवाड्यात येत्या काही दिवसात हलक्या सरींची शक्यता

October 2, 2015 3:12 PM |

 

Rain in Nelloreउत्तर भारतातून नैऋत्य मान्सूनने काढता पाय घेतला असला तरी पूर्व आणि ईशान्य भारतात मात्र अजूनही नैऋत्य मान्सून कार्यरत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र व पश्चिम किनारपट्टीला अधूनमधून पावसाच्यासरी पडत आहेत. तब्बल दहा दिवसांच्या अंतरानंतर काल मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. नांदेड व औरंगाबाद येथे गेल्या चोवीस तासात १ मिमी पावसाची नोंद झाली.

अरबी समुद्रावरून (नैऋत्य दिशेकडून) येणारे वारे व आग्नेयेकडून (बंगालच्या उपसागरातून) येणारे वारे हे मराठवाड्या जवळ एकत्र येत आहेत. त्यामुळे मराठवाडा व लगतचा मध्य महाराष्ट्र या भागात येत्या २ ते ३ दिवसात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा हा एक असा भाग आहे कि ज्या भागात संपूर्ण मान्सूनच्या दरम्यान खूपच कमी पाऊस पडला. यंदा जून महिन्यात या भागात १७% कमी पाऊस झाला जुलै व ऑगस्ट तर जवळजवळ कोरडेच गेले. जुलै मध्ये सर्वसामन्य पावसाच्या ५६% तर ऑगस्ट मध्ये ५०% कमी पाऊस झाला. तसेच सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाल्या मुळे मराठवाड्यातील पावसाची कमतरता कमी होवून ४०% झाली. मराठवाडा (जालना बीड आणि परभणी) या भागात येत्या काही दिवसात ऑक्टोबर महिन्यातही सप्टेंबर महिन्यासारखा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसाची तीव्रता ४ ऑक्टोबरच्या दरम्यान वाढणार आहे.

Image Credit: ibnlive.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try