Skymet weather

[MARATHI] नव्याने निर्माण झालेला पश्चिमी विक्षोभ पहाडी भागात दाखल – दिल्ली एनसीआर ला पावसाची शक्यता

April 28, 2015 3:20 PM |

 

rainनविन निर्माण झालेला पश्चिमी विक्षोभ हा जम्मूकाश्मीर मधील पहाडी भागात दाखल झालेला आहे. भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेनुसार या विक्षोभाचा परिणाम साधारणतः ३० एप्रिल पासून दिसतील. पश्चिमी विक्षोभ हा साधारपणे ३ दिवसात नाहीसा होईल तसेच याचा परिणाम म्हणून जम्मूकाश्मीर, उत्तराखंडातील काही भाग, हिमाचल प्रदेश आणि सपाटीवरील उत्तर भारत यात दिल्ली एनसीआर या भागात पाऊस येण्याची दाट शक्यता निर्माण होईल.

स्कायमेट ने वर्तविल्यानुसार पश्चिमी विक्षोभ हा २७ एप्रिलला जम्मूकाश्मीरला धडकला आणि या भागात चांगलाच पाऊसही झाला. स्कायमेट कडे असलेल्या पावसाच्या नोंदीनुसार गुलमर्ग येथे सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात २८ मिमी पाऊस झाला. तसेच राज्याची राजधानी श्रीनगर येथे २०.२ मिमी आणि पहलगाम व कोकेरनाग येथे अनुक्रमे २४ मिमी व २१ मिमी पावसाची नोंद केली गेली. उत्तरकाशी आणि नैनिताल या भागातही अनुक्रमे २१ मिमी आणि २ मिमी पावसाची नोंद केली गेली.

हा विक्षोभ आता मंदावला असून बुधवार पर्यंत तापमानात काही अंशी वाढ होईल. हा विक्षोभ या भागात धडकण्यापूर्वी चांगलाच पाऊस झालेला दिसून आला. सध्यातरी कमाल तापमान हे नेहमीच्या सरासरीपेक्षा कमी आहे. श्रीनगरमध्ये सोमवारी दिवसाचे कमाल तापमान १२.७ से. ला स्थिरावले म्हणजेच नेहमी असणाऱ्या सरासरीपेक्षा १० से. ने कमी होते. पहलगाम येथेही कमाल तापमान ११ से. ने मासिक सरासरीपेक्षा कमी आहे. कटरा जे समुद्र सापाटी नुसार कमी उंचीवर आहे, येथेही दिवसाचे तापमान २८ से. ला स्थिरावले जे सरासरीपेक्षा ४ से. ने कमी आहे.

पश्चिमी विक्षोभ हा नेहमी या वेळेत उत्तरेकडे सरकताना दिसतो आणि या विक्षोभाच्या निर्मितीची शक्यताही कमी असते. पण यंदा  या प्रणालीची हालचाल हि नेहमी पेक्षा वेगळी आहे. या प्रकारची प्रणाली काही ठराविक कालावधीनंतर दिसतात आणि त्यामुळे पहाडी भागात आणि सपाट भागात चांगलाच पाऊस होतो. यामुळेच उत्तर भारतात आपण सध्या छान गार वातावरण अनुभवत आहोत.

Image Credt: hindustantimes.com

 

 

 

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try