Skymet weather

[Marathi] दीर्घ काळ सुरु असलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम पिकांवर मोठ्या प्रमाणात

April 20, 2017 7:23 PM |


महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात उष्णतेच्या लाटेने कहर तर केलाच आहे आणि सध्या काही दिवसांपासून पकड अजूनच मजबूत झालेली दिसून येत आहे. कारण महिनाभर ४० अंश से. असे तापमान होते पण गेले काही दिवस ते ४३ अंश से. ते ४६ अंश से. मध्ये स्थिरावले आहे.

आणि पुढचे आणखी काही दिवस उष्णतेचा पारा असाच चढता असणार आहे.

या उष्णतेने महाराष्ट्रातील फक्त जनताच होरपळून निघत नसून आता त्याचा परिणाम तेथील पिकांवरही दिसून येतो आहे. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहिती नुसार मक्याचे पिक तर उष्णतेने कोमेजून गेले आहे. आणि त्यातच ३० ते ४० % पिकाची कापणी अजूनही राहिली आहे.

याच दरम्यान वाढती उष्णता आणि गरम वारे यामुळे जालन्यातील परतूर तालुका येथेही केळीची पानेही फाटणे सुरु झाल्याने केळीच्या पिकावरही परिणाम दिसून येत आहे. तसेच डाळिंबाचेही झाले आहे उष्णतेमुळे ते वेळेआधीच उलण्यास सुरुवात झाली आहे.

द्राक्षांची ९०% कापणी झाली असून उरलेले १० % अजूनही द्राक्ष वेलीवरच आहेत आणि आता ते हि गळून पडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच जालना, बदनापूर, घनसावंगी, मंथा आणि जाफराबाद येथील मोसंबी वर हि या उष्णतेचा परिणाम झाला असून ते हि गळून पडण्यास सुरुवात झाली आहे.
यातून सुटकेचे चिन्ह लवकर नाही.

स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेतील हवामान तज्ञांनी दिलेल्या माहिती नुसार अजून काही दिवस तरी या उष्णतेपासून सुटका होण्याचे चिन्ह दिसत नाही कारण उत्तरेकडील गरम जमीन आणि त्यावरून येणारे उष्ण वारे वाहतच राहतील.

सध्या वातावरणात एकही हवामान प्रणाली तयार होताना दिसून येत नसल्याने मार्च मध्येच उष्णतेचा कहर होण्यास सुरुवात झाली होती. आणि एप्रिल हि असाच गरमी आणि उकाडा घेऊनच सुरु झाला आणि जसजसे उन्हाळ्याकडे वाटचाल होईल तसतसे तापमान वाढच राहील.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या “मरुथा” या चक्रीवादळाचाही फारसा परिणाम मध्य भारतात झाला नाही कारण ते बंगालच्या किनारपट्टी वरच मर्यादीद राहिले तसेच त्यामुळे एखादी हवामान प्रणालीही तयार झाली नाही कि ज्यामुळे भारताच्या मध्य भागात काही परिणाम होईल. तसेच येणाऱ्या काळातही अशी एखादी हवामान प्रणाली तयार होताना आढळलेली नाही. तसेच पारा १, २ अंशाने कमी मात्र होईल पण फारसा फरक मात्र जाणवणार नाही.
आता जून दरम्यान मान्सून च्या आगमनाची चाहूल लागताच यातून सुटका होईल असा अंदाज आहे.

Image credit: Livemint

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try