Skymet weather

[Marathi] MD Skymet, Jatin Singh: मान्सून पूर्व आणि मध्य भारतापुरता मर्यादित, दिल्ली, एनसीआर, हरियाणा आणि पंजाबमध्ये आठवड्याच्या उत्तरार्धात वेगवान पावसाळी गतिविधी, मुंबईत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता, मात्र दक्षिण द्वीपकल्पात कमकुवत पावसाळी गतिविधी

September 2, 2019 2:16 PM |

Maharashtra rains

मान्सून हंगामातील शेवटच्या महिन्याला सुरुवात या आठवड्यात होत आहे. जुलै आणि ऑगस्टच्या उत्तरार्धात जून महिन्यात कमी झालेल्या पावसाची भरपाई झाली असून एकंदरीत पाहता गेल्या तीन महिन्यांत एकूणच देशभरात सरासरी पाऊस झाला आहे.

स्कायमेटकडे उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत देशात आतापर्यंत ७१६.९ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा मध्य भारत हा पावसाचा मुख्य लाभार्थी होता, ज्यात एकूण १२टक्के पावसाचे आधिक्य आहे. पूर्व आणि उत्तर-पूर्व भारत या जास्त पावसाच्या प्रांतांमध्ये यावर्षी पावसाची १९% कमतरता आहे.

Rainfall-Deficiency-in-India-768x263

स्कायमेटच्या आधीच वर्तविलेल्या अंदाजानुसार, गेल्या आठवड्यात मान्सून कमकुवत झाला व फक्त देशाच्या मध्यवर्ती भागात काही प्रमाणात जोरदार पाऊस पडला. मागील आठवड्यात एकूण पाऊस सर्वसामान्यपेक्षा कमी होता आणि प्रामुख्याने दक्षिण द्वीपकल्पात कमकुवत पावसाळी गतिविधी दिसून आल्या. या आठवड्यात देखील पावसाच्या बाबतीत असेच सुरू राहण्याची अपेक्षा आहे.

मान्सून काही विशिष्ट भागांपुरता मर्यादित

या आठवड्यात एकाच वेळी दोन मान्सून प्रणाली तयार होण्याची अपेक्षा आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या राजस्थानात एक कमकुवत कमी दाबाचे क्षेत्र विकसित होईल ज्यामुळे या भागात काही प्रमाणात पाऊस पडेल.

दुसरी, मजबूत मान्सून प्रणालीमुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र म्हणून उदयास येणारी हि प्रणाली पोडूल चक्रीवादळाचा एक उर्वरित अंश आहे. ही प्रणाली उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल ज्यामुळे पूर्व, मध्य आणि उत्तर भारतातील हवामानावर परिणाम होईल आणि राजस्थान आणि गुजरातपर्यंत त्याचा प्रभाव पडेल. उत्तर-पश्चिम दिशेने जाताना या यंत्रणेच्या परिघातील उत्तर आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि महाराष्ट्रात विखुरलेला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

पंजाब, हरियाणा आणि दिल्ली एनसीआरच्या काही भागात आठवड्याच्या उत्तरार्धात मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या खालच्या भागातही तीव्र पावसाळी गतिविधी अनुभवल्या जाण्याची शक्यता आहे.

पावसाळी गतिविधींच्या बाबतीत काही काळ सुप्त पडलेल्या पश्चिम किनारपट्टीवर देखील या आठवड्यात व्यापक मध्यम सरी अनुभवण्यात येतील. दक्षिण द्वीपकल्पात मात्र कमकुवत पावसाळी गतिविधी सुरु राहतील व चेन्नई येथे बहुधा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतामध्ये कोणत्याही धोकादायक पावसाळी गतिविधी अपेक्षित नाही.

मुंबईत मध्यम पाऊस

देशाची व्यावसायिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या पंधरवड्यात मान्सून कमकुवत राहिला. मात्र या आठवड्यात शहरात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

पिकांवर परिणाम

हलका पाऊस पिकासाठी फायदेशीर ठरणार आहे कारण बहुतेक पीक फुल धारणेच्या अवस्थेतून निघून आता शेंगा तयार होण्याच्या अवस्थेत आहे. या टप्प्यावर चांगला पाऊस झाल्यास चांगले उत्पादन मिळेल. परंतु जास्त पाऊस पडल्यास ज्या ठिकाणी जमिनीतील ओलावा आधीच जास्त आहे अशा ठिकाणी पिकांचे नुकसान होऊ शकते.

Image Credits – IBT Times India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try