[Marathi] 27 फेब्रुवारी- महाराष्ट्रात दिवसा हवामान कोरडे व रात्र थोडी उबदार राहणार

February 27, 2018 11:00 AM|

 

गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण प्रामुख्याने कोरडेच राहिलेले आहे. उपविभाग निहाय पाहिले तर विदर्भ आणि मराठवाडा येथे कमाल तापमान सामान्यपेक्षा ३ ते ४ अंश व किमान तापमानात देखील सामान्यपेक्षा २ ते ३ अंशांची वाढ नोंदवण्यात येत आहे.   त्यामुळे नागपूर, अकोला, वाशीम, लातूर, परभणी व नांदेड येथे दिवस उष्ण आणि रात्र देखील किंचित उबदार राहण्याची अपेक्षा आहे.   [yuzo_related]

मध्य-महाराष्ट्र व कोकण विभागात देखील हवामान कोरडेच असून, येणाऱ्या दिवसात प्रामुख्याने रत्नागिरी, मुंबई, सातारा, सांगली, पुणे व नाशिक येथे हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांना सल्ला देण्यात येतो कि गहू व इतर रब्बी पिकांच्या कापणीस सुरुवात करावी. तसेच, आवश्यकतेनुसार पिकांना सिंचन द्यावे व परिपक्व फळे काढण्यास सुरुवात करावी.

आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:

मुंबईत, तापमान उष्ण असण्याची शक्यता असून, अंशतः ढगाळ वातारणासह कमाल तापमान ३८ अंश से. आणि किमान २१ अंश से. असण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये कमाल ३७ अंश सेल्सिअस आणि किमान १७ अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे.

पुणे येथे हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९ अंश सेल्सियस राहण्याची अपेक्षा आहे.

रत्नागिरी येथे ढगाळ वातावरणासह कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर येथे देखील अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस आणि किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

वर्धा येथे अंशतः ढगाळ वातावरणामुळे हवामान उष्ण राहील, त्यामुळे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

अकोला येथे अंशतः ढगाळ वातावरणासह दिवसा तापमान ३७ अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

औरंगाबादमध्ये हवामान उष्ण राहण्याची शक्यता असून अंशतः ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान सुमारे ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

गरज और वर्षा वाले बादलों की ताज़ा स्थिति जानने के लिए नीचे दिए गए मैप पर क्लिक करें।Rain in India

जळगाव येथे मात्र निरभ्र आकाश राहण्याची शक्यता असून कमाल तापमान ३८ अंश व किमान तापमान २० अंश से. राहण्याची अपेक्षा आहे

नागपूरमध्ये देखील हवामान उष्ण असण्याची शक्यता असून, अंशतः ढगाळ वातारणामुळे दिवसा तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

Similar Articles