Skymet weather

[Marathi] 26 जुलै - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: नागपूर, अमरावती, चंद्रपूर येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस

July 25, 2017 4:33 PM |

 

महाराष्ट्रातील कोंकण किनारपट्टीवर आणि मध्य-महाराष्ट्रातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस झालेला आहे. दरम्यान, मराठवाडा मात्र जवळजवळ कोरडा राहिला आहे. 

मराठवाड्यातील नांदेड, सोलापूर, परभणी आणि औरंगाबाद शहरांमध्ये तुरळक ठिकाणी खूपच हलका पाऊस पडत आहे. तसेच, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत देखील पावसाचे प्रमाण कमी होत आहे.

[yuzo_related]

येत्या 48 तासांत विदर्भात तुरळक पावसाची अपेक्षा आहे. दरम्यान, कोकण व गोवा विभागात पावसाचा जोर  कमी  होण्याची चिन्हे आहेत. हर्णे, महाबळेश्वर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि रत्नागिरी येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Rain In Mumbai

आणि पुढील तीन ते चार दिवसांनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर हवामान पूर्णपणे कोरडे होईल असा अंदाज आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try