Skymet weather

24 जुलाई - नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, महाबळेश्वर येथे पाऊस

July 24, 2018 10:07 AM |

कोकण आणि गोव्यात पावसाचा जोर कमी झालेला असला तरी आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे या क्षेत्राला चांगलाच फटका बसलेला आहे. दुसरीकडे, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर मात्र पावसाचा जोर तुलनेने खूपच कमी राहिलेला असून हे विभाग जवळजवळ कोरडेच वातावरण अनुभवत आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, झारखंड आणि शेजारच्या परिसरावर असलेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवस मध्य-महाराष्ट्रावर मात्र पावसाचा लपंडाव सुरूच राहील. दरम्यान, कोकणात पुढील ४८ तास हलका पाऊस होण्याची अपेक्षा असून मध्यम ते जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही. प्रामुख्याने नागपूर, अकोला, गोंदिया, अमरावती, वर्धा, बुलढाणा, भंडारा,महाबळेश्र्वरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. दरम्यान, रत्नागिरी, वेंगुर्ला, रायगड, सिंधुदुर्गमध्ये मध्यम तर मुंबईत मात्र हलका पाऊस राहील.

[yuzo_related]

त्यानंतर, कोकण आणि गोव्यात पावसाचा जोर कमी होईल. तापमानाच्या बाबतीत सांगायचे तर संपूर्ण राज्यातील तापमान ३०-३२ अंशांच्या आसपास राहील.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:

मुंबई येथे कमाल तापमान 30 अंश सेल्सियस आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 28 अंश सेल्सियस आणि रात्री २1 अंश सेल्सियस नोंदवले जावू

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 26 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील

वर्धामध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस असेल तर किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.Rain in India

औरंगाबादमध्ये दिवसा तापमान 27 अंश सेल्सियस आणि रात्री तापमान 23 अंश सेल्सियसच्या आसपास राहील.

नागपूर येथे कमाल 30 अंश सेल्सिअस तर किमान 23 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try