[Marathi] 16 मार्च- महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपीटीची शक्यता

March 15, 2018 6:49 PM|

 

राज्यात मागील काही दिवसांपासून हवामान उष्ण व कोरडेच राहिलेले आहे, तसेच तापमानाचा पारा सामान्यपेक्षा अधिक आहे.

सध्या, एक कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात उपस्थित असून उत्तर मध्य-महाराष्ट्रावर देखील एक चक्रवाती परिस्थिती कार्यरत आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि कोकण व गोवा येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळ राहील.

[yuzo_related]

आज हवामान गतीविधी प्रामुख्याने उत्तरेकडील भागांकडे अधिक असेल व उद्या पावसाळी गतीविधी दक्षिणेस सरकेल. तसेच काही भागांमध्ये गारपीटीची शक्यता देखील आहे ज्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या काळात मुंबईत देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया: मुंबई येथे कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस आणि किमान २५ अंश सेल्सिअस तसेच ढगाळ आकाशासह पावसाची शक्यता देखील आहे.

नाशिकमध्ये दिवसाचे तापमान ३३ अंश सेल्सियस आणि रात्री १९ अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते.

पुणे येथे कमाल २८ अंश सेल्सियस आणि किमान १८ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीत दिवसाचे तापमान ३१ अंश सेल्सियस आणि रात्रीचे २४ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान २८ अंश सेल्सियस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

वर्धामध्ये कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस असेल तर किमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

गरज और वर्षा वाले बादलों की ताज़ा स्थिति जानने के लिए नीचे दिए गए मैप पर क्लिक करें।Rain in India

अकोला येथे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान २२ अंश सेल्सियस इतके राहणार आहे.

औरंगाबादमध्ये दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस आणि रात्री तापमान १६ अंश सेल्सियसच्या आसपास राहील.

जळगावात कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस असेल तर किमान १७ अंश सेल्सियस अपेक्षित आहे.

नागपूर येथे कमाल ३१ अंश सेल्सिअस तर किमान २३ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

Similar Articles