>  
>  
3 नोव्हेंबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मराठवाडाच्या काही भागांवर हलक्या पाऊसाची शक्यता; विदर्भाच्या हवामानात कोणताही बदल नाही

3 नोव्हेंबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मराठवाडाच्या काही भागांवर हलक्या पाऊसाची शक्यता; विदर्भाच्या हवामानात कोणताही बदल नाही

06:26 PM


महाराष्ट्रातील रहिवाशांना कोरड्या हवामाना पासून नोव्हेंबर महिन्यातही सुटका मिळण्याची अपेक्षा नाही.

सध्या,हवामानाची परिस्थिती पाहता , राज्यातील अनेक भागांवर दिवस व रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा अधिक आहे.

दरम्यान येणाऱ्या दिवसात दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीपासून मध्य महाराष्ट्र पर्येंत एक ट्रफ रेषा विकसित होणी अपेक्षित आहे ज्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण- गोवा येथे हलका पाऊस अपेक्षित आहे.

3 नोव्हेंबरच्या आसपास मुंबईकर हलका पाऊस अनुभवतील.शिवाय, 5 नोव्हेंबरच्या आसपास मराठवाडाच्या काही भागांवर हलक्या पाऊसाची शक्यता आहे .परंतु विदर्भाच्या हवामानात कोणताही बदल नसून,कोरडेच हवामान सुरु राहतील.

आता महाराष्ट्राच्या प्रमुख शेहरांच्या तापमानावर नजर टाकूया-

मुंबईत अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 34 अंश से. आणि किमान 23 अंश से. असण्याची शक्यता आहे.

नाशिक मध्ये अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पाऊसाची शक्यता असून कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान 15 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.Rain in India

पुणे येथे अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पाऊसाची शक्यता असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 अंश राहण्याची अपेक्षा आहे.

वर्धा येथे अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

अकोला येथे अंशतः ढगाळ आकाशासह दिवसा तापमान 33 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

नागपूर येथे अंशतः ढगाळ आकाशासह दिवसा तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.