>  
>  
[Marathi] 12 ऑक्टोबर- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: पुढील दोन दिवस मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मुसळधार पावसाची शक्यता

[Marathi] 12 ऑक्टोबर- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: पुढील दोन दिवस मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मुसळधार पावसाची शक्यता

05:26 PM

 

गेल्या २४ तासात, महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झालेली आहे. प्रामुख्याने बीडमध्ये ७७ मिलीमीटर, उस्मानाबादमध्ये ५४ मिमी आणि सोलापूर येथे ३५ मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

पुढील दोन दिवसात, विशेषत: मराठवाडा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मात्र, ढगाळ आकाशासह हवामान आरामदायक राहील.

मुंबईत देखील हलक्या सरींची शक्यता आहे. पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, जळगांव, मुंबई, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Related Post

त्यानंतर मात्र १३ ऑक्टोबरच्या आसपास राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Rain In Mumbai

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com