>  
>  
[Marathi] 17 ऑक्टोबर - मुंबईत गरमी, १८ ऑक्टोबर रोजी हलक्या पावसाची शक्यता

[Marathi] 17 ऑक्टोबर - मुंबईत गरमी, १८ ऑक्टोबर रोजी हलक्या पावसाची शक्यता

05:49 PM


राज्यातील वाढलेल्या तापमानावरून असे दिसून येते की आगामी उत्सवांच्या काळात नागरिकांची उष्णतेपासून सुटका निश्चितच नाही. विदर्भासह, कोकण आणि गोव्यातील तापमान 2 अंशांनी वाढले आहे, तर मुंबईमध्ये देखील पारा 35 ते 37 अंशांपर्यंत वाढला आहे.

पूर्व आणि पूर्वोत्तर दिशेने राज्यात येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे दिवसा तापमान ३० अंशांच्या पलीकडेच स्थिरावणार असे दिसत आहे ज्यामुळे वातावरणात अस्वस्थता निश्चितच अपेक्षित आहे. दरम्यान समुद्र किनाऱ्याच्या सानिध्यात असलेल्या ठाणे, डहाणू आणि मुंबईत हळूहळू वाढणाऱ्या तापमानासह आर्द्रतेमुळे रहिवाशांना उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागेल.

तथापि, १८ ऑक्टोबर च्या आसपास कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्यामुळे कोकण आणि गोव्यासह, मध्य-महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका पाऊस होवून उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:

मुंबईत कमाल तापमान 35 अंश से. आणि किमान 24 अंश से. असण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये कमाल 33 अंश सेल्सिअस आणि किमान 17 अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे.

पुणे येथे अंशतः ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० अंश राहण्याची अपेक्षा आहे.

रत्नागिरी येथे ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश असण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर येथे देखील अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता असून, कमाल तापमान 32 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

वर्धा येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.Rain in India

अकोला येथे दिवसा तापमान 36 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

औरंगाबाद कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

जळगाव येथे कमाल तापमान 36 अंश व किमान तापमान 18 अंश से. राहण्याची अपेक्षा आहे.

नागपूरमध्ये दिवसा तापमान 34 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.