>  
>  
[Marathi] 18 ऑक्टोबर - कोकण-गोव्यात हलका पाऊस, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडे

[Marathi] 18 ऑक्टोबर - कोकण-गोव्यात हलका पाऊस, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडे

06:33 PM


ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाची तुट राहिलेली असून, दुष्काळ सदृश्य परिस्थिती अनुभवण्यात येत आहे. मध्य-महाराष्ट्रात 75% , मराठवाड्यात 85%, विदर्भात 99% तर कोकण आणि गोव्यात 69%कमी पाऊस नोंदवण्यात आलेला आहे.

दरम्यान, वरुणराजाने आपली कृपादृष्टी राज्यावर दाखवलेली असून मध्य-महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह रत्नागिरी तसेच कोकण-गोव्यात हलक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. सोलापुरात देखील जोरदार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

सध्या दक्षिण मध्य-महाराष्ट्रावर चक्रवाती प्रणाली उपस्थित असल्यामुळे पावसाचा जोर किंचित वाढण्याची शक्यता आहे. या पावसाचा जोर दक्षिण महाराष्ट्रावर प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांवर राहण्याची अपेक्षा आहे. पण राज्यातील पावसाची तुट कायम राहणे अपेक्षित आहे. दुसरीकडे मात्र, उत्तर कोकणसह, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग कोरडे आणि उष्णच राहतील.

आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:

मुंबईत कमाल तापमान 35 अंश से. आणि किमान 24 अंश से. असण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता असून कमाल तापमान 32अंश सेल्सिअस आणि किमान 18 अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.Rain in India

पुणे येथे अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता असून कमाल तापमान 31अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश राहण्याची अपेक्षा आहे.

वर्धा येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

अकोला येथे दिवसा तापमान 36 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

नागपूरमध्ये दिवसा तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 18 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.