>  
>  
[Marathi] 14 सप्टेंबर- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: पुणे, नागपूर, अकोला, मुंबई, कोल्हापूर, अमरावती येथे पाऊस

[Marathi] 14 सप्टेंबर- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: पुणे, नागपूर, अकोला, मुंबई, कोल्हापूर, अमरावती येथे पाऊस

02:57 PM


 

गेल्या २४ तासांत पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांत हजेरी लावलेली आहे. त्यामुळे मुंबई, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अलिबाग, भिरा, गोंदिया आणि कोल्हापूर या काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यांसह महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

पुढील दोन ते तीन दिवसात जालना, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, नागपूर, अकोला, अमरावती, परभणी, कोल्हापूर, भिरा, महाबळेश्वर आणि मुंबई या शहरांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे, या शहरांमधील हवामान नक्कीच आल्हाददायक होईल. 

Related Post

तसेच, राज्यात अपेक्षित असलेल्या या पावसामुळे विदर्भातील पावसाची तूट कमी होईल आणि महाराष्ट्रातील अन्य उपविभागात देखील पाऊस सरासरीच्या वर जाणार असे अपेक्षित आहे.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Rain In Mumbai

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com