>  
>  
[Marathi] 5 सप्टेंबर- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, पुणे, नागपूर येथे गणेशोत्सवात हलका पाऊस, तर औरंगाबाद, परभणी, लातूर जिल्ह्यात कोरडे हवामान

[Marathi] 5 सप्टेंबर- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, पुणे, नागपूर येथे गणेशोत्सवात हलका पाऊस, तर औरंगाबाद, परभणी, लातूर जिल्ह्यात कोरडे हवामान

06:32 PM

 

या वर्षी मान्सून ने गणेशोत्सवाबरोबर परत हजेरी लावलेली आहे. मागील काही दिवस पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले आहे, त्यामुळे लोकांना सुखकारक वातावरणात गणेशोत्सव साजरा करता येतो आहे. कोकणातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे आहे. तसेचमुंबई मध्ये देखील हवामान कोरडे आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील हवामानात कोणतेही लक्षणीय बदल अपेक्षित नाहीत परंतु विदर्भातील काही भागांमध्ये मात्र हलक्या सरींचा अंदाज आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, एक कमी दाबाचा पट्टा उत्तरेला पश्चिम बंगाल पासून दक्षिणेला तामिळनाडूपर्यंत तयार झालेला आहे, जो छत्तीसगढ व तेलंगाणा राज्यातून जात आहे. शिवाय, दक्षिण-पूर्व राजस्थानावर देखील एक हवामान प्रणाली कार्यरत आहे.

Related Post

त्यामुळे पुढील २४ तासांत विदर्भात प्रामुख्याने नागपूर, अकोला, गोंदिया आणि चंद्रपूर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान कोकणात पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे, मात्र एक दोन सरींची शक्यता नाकारता येत नाही व पुण्यात देखील आज हलका पाऊस होवू शकतो. दरम्यान, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात मात्र वातावरण मुख्यतः कोरडेच राहण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Rain In Mumbai

पुढील दोन दिवसांनंतर कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असल्यामुळे विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात हलक्या सरी होवू शकतात.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com