Skymet weather

हवामान अंदाज 16 डिसेंबर: विदर्भात पावसाची शक्यता, धुकेमुळे दिल्लीत दृश्यता शून्य मीटर

December 15, 2019 6:36 PM |

दक्षिण भारतापासून सुरुवात करूया, केरळ किनाऱ्यालगत दक्षिण पूर्व अरबी समुद्रामध्ये एक ट्रफ रेषा विस्तारित आहे. तामिळनाडू आणि रायलसीमाच्या आसपासच्या भागांवर दोन वेगवेगळ्या दिशेने वारे वाहत आहे. या परिस्थितीत तामिळनाडू, केरळ आणि रायासीमाच्या दक्षिणेकडील भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा उर्वरित भाग ढगाळ आकाशासह हवामान कोरडे राहील. उत्तर तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशात एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडेल.

पूर्व आणि ईशान्य भारतात, चक्रवाती परिस्थिती आसाम आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रात आहे. ज्यामुळे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. वरच्या भागात हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये इतर ठिकाणी हलका पाऊस पडेल. या भागात पहाटे धुक्याची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

ओडिशाहून मराठवाड्यापर्यंत विदर्भाच्या आसपास एक ट्रफ रेषा विस्तारित आहे. दक्षिण मध्य प्रदेश आणि विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. अन्यथा, इतर भाग कोरडे राहतील. रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील उत्तर भागांमध्ये पहाटे धुके असण्याची शक्यता आहे. तर ओडिशा, तेलंगणाच्या उत्तरेकडील भाग आणि आंध्र प्रदेशात एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडेल.

शेवटी उत्तर व उत्तर पश्चिम भारतात, उत्तर पश्चिम दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे आणि पश्चिमी विक्षोभाच्या अवशेषांमुळे वरच्या भागांत हलका पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता आहे. तथापि, उत्तर पश्चिम मैदानावर हवामान कोरडे राहील. धुक्यामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीत दृश्यता शून्य मीटर राहील

Any information taken from here should be credited to skymetweather.com







For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories






latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×