Skymet weather

हवामान अंदाज 9 डिसेंबर: दक्षिण भारतात पाऊस, मध्य भारतात हवामान कोरडेच

December 8, 2019 6:03 PM |

दक्षिण भारतापासून सुरुवात करूया, दक्षिण पूर्वी अरबी समुद्रावर आणि लगतच्या दक्षिण पश्चिम अरबी समुद्रावर डिप्रेशन विकसित झाले आहे. हि प्रणाली भारतीय किनाऱ्यापासून दूर जाईल. त्यामुळे त्याचा परिणाम भारतावर नगण्य असेल. तथापि, दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळ किनारपट्टीवर आणखी 24 तास जोरदार वारे वाहू शकतात. किनाऱ्यावरील कर्नाटकात एक किंवा दोन मध्यम सरींसह पाऊस सुरू राहील, दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये विखुरलेला पाऊस पडेल. अंतर्गत केरळ आणि कर्नाटकात एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य भारताबद्दल बोलायचं तर, कोणतीही महत्त्वपूर्ण हवामान प्रणाली सध्या उपस्थित नाही आहे. तथापि, आम्हाला राजस्थानच्या पश्चिम भागातील तसेच गुजरातच्या काही भागांत किमान तापमानात किरकोळ घट अपेक्षित आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि विदर्भाचे हवामान कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

उत्तर भारतात, अफगाणिस्तान आणि त्याच्या आसपासच्या भागात पश्चिमी विक्षोभ विकसित आहे. आम्ही उत्तरेकडील वारे उत्तर मैदानावर सुरू राहण्याची अपेक्षा करतो. राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतातील हवामान कोरडे राहील. दिल्ली प्रदूषणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पूर्व भारतात, बांगलादेशच्या पूर्वेकडील भागांवर चक्रवाती परिस्थिती आहे. तथापि, आर्द्रतेच्या अभावामुळे पूर्व आणि ईशान्य भारतात कोणत्याही महत्त्वपूर्ण गतिविधींची अपेक्षा नाही आहे. हवामान कोरडे राहील. तथापि, सकाळच्या वेळी धुके दिसून येईल. येथे किमान तापमानात किरकोळ घट होण्याची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com







For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories






latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×