Skymet weather

हवामान अंदाज 25 फेब्रुवारी: पूर्व भारतात पाऊस, मुंबईसह मध्य भारतात हवामान कोरडेच

February 24, 2020 5:46 PM |

पूर्व भारतापासून सुरुवात करूया, चक्रवाती परिसथिती बिहार आणि झारखंडमध्ये आहे. उत्तर कर्नाटक ते पश्चिम बंगाल पर्यंत एक ट्रफ विस्तारित आहे. बंगालच्या उपसागरापासून दमट वाऱ्यांमुळे आर्द्रता वाढत आहे, म्हणून ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता आहे. दरम्यान, बिहारमध्ये विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पूर्व उत्तर प्रदेशात एक दोन ठिकाणी सरी बरसण्याची शक्यता आहे. गंगीय पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाच्या काही भागांत मेघगर्जनेची शक्यता आहे. कोलकाता, रांची, पाटणा आणि जमशेदपूर येथे एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर सिक्कीमसह ईशान्येकडील राज्यात विखुरलेला पाऊस सुरू राहील.

मध्य भारताबद्दल बोलायचे झाले तर छत्तीसगडच्या बऱ्याच भागात आणि पूर्व मध्य प्रदेशातील एक-दोन ठिकाणी पाऊस सुरूच राहील. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील बऱ्याच भागात हवामान कोरडे राहील. मुंबईत हवामान उबदार राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

उत्तर भारतात येताच, पश्चिमोत्तर कोरडे वारे पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश या उत्तर भागांमध्ये कायम राहतील. उत्तरेकडील मैदान तसेच जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमधील बहुतेक ठिकाणी हवामान कोरडे राहील. दरम्यान, उत्तराखंडमध्ये विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली प्रदूषण ‘मध्यम ते खराब’ श्रेणीत असेल.

दक्षिण भारतात, उत्तर आंध्र प्रदेशात संगम झोन तयार झाल्यामुळे, आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टी जिल्ह्यात विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तेलंगाणा, रायलासीमा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ मध्ये हवामान कोरडे राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com








For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories






The advantage of staying at home on a rainy day is that you can get comfortable, turn on your mobile, and get to play at a bitcoin casino with a cup of tea. While that heavy rain is falling, you get to play your favorite bitcoin casino games without any worry in the world. The advantage of playing in a crypto casino is that you can log in anywhere at any time.

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×