Skymet weather

हवामान अंदाज 5 फेब्रुवारी: विदर्भात हलक्या पावसाची शक्यता, मुंबईतील तापमानात घट होईल

February 4, 2020 5:12 PM |

पश्चिमी विक्षोभ पूर्वेकडे सरकत आहे, परंतु जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात विखुरलेला पाऊस आणि बर्फवृष्टी कायम राहील. उत्तराखंडमध्ये ५ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत एक दोन ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. दरम्यान, वाऱ्यांची दिशा उत्तर-पश्चिम मैदानावर ५ फेब्रुवारीच्या दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत उत्तर-पश्चिम दिशेने बदलेल. तोपर्येन्त उत्तर पश्चिम भारतातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील एक किंवा दोन भागात मध्यम ते दाट धुक्याची शक्यता आहे.

मध्य भारतात, झारखंड ते विदर्भ पर्यंत एक ट्रफ रेषा विस्तारित आहे. बंगालच्या उपसागरापासून उष्ण वारा ओलावा वाढवत आहे. अशा प्रकारे, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विखुरलेल्या हलक्या ते माध्यम पावसासह एक दोन ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भात एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश आणि उर्वरित महाराष्ट्रातील हवामान मात्र कोरडे राहील. दरम्यान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश आणि उत्तर कोकण आणि गोवा तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील दिवसा-रात्रीच्या तापमानात काही अंशांची घट होऊ शकते. मुंबईतील तापमानात काही अंशांनी घट होईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

देशाच्या पूर्वेकडील भागात, ओडिशामध्ये विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण झारखंडमध्ये एक दोन ठिकाणी हलकी सरी पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचे हवामान कोरडे राहील. शिवाय चक्रवाती परिस्थिती आसामवर आहे, अशा प्रकारे पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिणेकडील, बंगालच्या उपसागरापासून उष्ण वारे कोस्टल आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये ओलावा वाढवत आहेत. अशा प्रकारे उत्तर कोस्टल आंध्र प्रदेशात हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. कोस्टल तमिळनाडूमध्येही एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्नाटक ते मध्य महाराष्ट्र पर्यंत ट्रफ पसरल्यामुळे केरळमध्ये एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







The advantage of staying at home on a rainy day is that you can get comfortable, turn on your mobile, and get to play at a bitcoin casino with a cup of tea. While that heavy rain is falling, you get to play your favorite bitcoin casino games without any worry in the world. The advantage of playing in a crypto casino is that you can log in anywhere at any time.

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×