Skymet weather

हवामान अंदाज 20 ऑगस्ट: विदर्भात हलका ते मध्यम पाऊस, मुंबईत पाऊस कमीच राहणार

August 19, 2019 6:47 PM |

लो-प्रेशर क्षेत्र उत्तर पूर्व मध्य प्रदेश आणि लगतच्या उत्तर प्रदेशवर आहे. त्यामुळे पूर्व व मध्य प्रदेशसह उत्तर छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंबिकापूर, बिलासपूर, सतना, जबलपूर आणि दमोह यासारख्या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भ आणि पूर्व राजस्थान मध्ये हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच, मराठवाड्यात आणि दक्षिण छत्तीसगड मध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. मुंबईत हलक्या पावसासह हवामान मुख्यतः कोरडे राहील. तर मॉन्सून गुजरात आणि उर्वरित महाराष्ट्रात कमकुवत राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

देशाच्या पूर्वेकडील भागात मान्सूनची अक्षीय रेषा लो-प्रेशर एरिया, दक्षिण झारखंड आणि उत्तर ओडिशाच्या जवळून जात आहे. म्हणूनच, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार, पश्चिम बंगाल आणि उर्वरित आसाम मध्ये हलका पाऊस पडू शकतो. दक्षिण भागात, ट्रफ रेषा उत्तर तटीय आंध्र प्रदेश ते तामिळनाडू पर्यंत विस्तारलेली आहे. आंध्र प्रदेश, तटीय कर्नाटक, केरळ आणि तेलंगणा आणि तामिळनाडूच्या काही भागात विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर मध्ये, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश मध्ये आता पाऊस कमी होईल. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर राजस्थानमध्ये हवामान कोरडे राहील. तथापि, स्थानिक पाऊस नाकारला जाऊ शकत नाही. पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल तर उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये भूस्खलन आणि पूर परिस्थितीची शक्यता नाकारता येत नाही.

Any information taken from here should be credited to skymetweather.com







For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories






latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×