Skymet weather

हवामान अंदाज 23 ऑगस्ट: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस

August 22, 2019 7:19 PM |

एक कमी दाबाचा पट्टा उत्तर पूर्व मध्य प्रदेश आणि त्याच्या आसपास आहे. एक कॉन्फ्लुएन्स झोन पश्चिम मध्य प्रदेशवर बनलेला आहे ज्यामुळे मध्य प्रदेश मध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यातील पश्चिम भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. छत्तीसगड, विदर्भ आणि पूर्व राजस्थान मध्ये विखुरलेला पाऊस सुरु राहील. मुंबई मध्ये विखुरलेल्या हलक्या पावसाची शक्यता आहे. कोंकण आणो गोवा, तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल.

उत्तर पश्चिम भारतात मान्सून कमकुवत राहील. उत्तराखंड मध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल. हिमाचल प्रदेश आणि हरियाणा मध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो. पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये मध्यम सरींची अपेक्षा आहे. पंजाब, उत्तर राजस्थान मध्ये हवामान जवळजवळ कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

मान्सूनची अक्षीय ट्रफ रेषांचा पश्चिम भाग ओडिशाला पार करून जात आहे ज्यामुळे ओडिशा आणि झारखंड मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. बिहार आणि गंगीय पश्चिम बंगाल मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सिक्कीम, आसाम, नागालैंड आणि अरुणाचल प्रदेश मध्ये काही मध्यम सरींची शक्यता आहे. कोलकाता मध्ये हवामान कोरडे राहील.

केरळ, कर्नाटक आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची अपेक्षा आहे.आंध्र प्रदेश, तेलंगाणा, रायलसीमा, तामिळनाडू आणि अंतर्गत कर्नाटक मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try