Skymet weather

हवामान अंदाज 26 ऑगस्ट: विदर्भ मध्ये हलका ते मध्यम पाऊस, मुंबईत उष्ण हवामानासह हलका पाऊस

August 25, 2019 7:29 PM |

मध्य भारतात, एक चक्रवाती परिस्थिती मध्य प्रदेशच्या मध्य भागांवर बनलेली आहे. ज्यामुळे पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व गुजरात आणि महाराष्ट्रातील उत्तर भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या राहिलेल्या भागात तसेच विदर्भ, गुजरात मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. मुंबई मध्ये हवामन गरम आणि उष्ण राहील. येथे ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारतात, पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरच्या उत्तर भागांवर बनलेला आहे. मान्सूनची अक्षीय रेषांचा पश्चिम भाग राजस्थानच्या उत्तर भागांना पार करून मध्य भारतापर्येंत जात आहे ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. याउलट, पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान आणि दिल्ली मध्ये हवामान गरम आणि कोरडे राहील. एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीवर बनलेली आहे. ज्यामुळे गंगीय पश्चिम बंगाल, ओडिशा, आणि झारखंड मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो. उत्तर पूर्व भारतात हवामान गरम आणि कोरडे राहील.

दक्षिण मध्ये, एक चक्रवाती परिस्थिती उत्तर बंगालच्या खाडीमध्ये विकसित झाली आहे. ज्यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या उत्तर भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण भागात हवामान कोरडे आणि गरम राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com







For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories






latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×