हवामान अंदाज 9 ऑगस्ट: मुंबई आणि रत्नागिरी मध्ये ९ आणि १० ऑगस्टला मुसळधार पाऊस अपेक्षित

August 8, 2019 7:05 PM |

डिप्रेशन आता कमकुवत होऊन संघटित कमी दाबाच्या पट्ट्यात परिवर्तित झाला आहे आणि सध्या पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या दक्षिण पूर्व राजस्थान मध्ये उपस्थित आहे ज्यामुळे गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेश मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरात आणि दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश मध्ये पूर सारखी पसरिस्थितीही दिसून येऊ शकते. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि अंतर्गत महाराष्ट्र मध्ये आता पावसाचा जोर कमी होईल. मुंबई आणि रत्नागिरी मध्ये ९ आणि १० ऑगस्टला मुसळधार पाऊस पडू शकतो.

पूर्व भारतात, मान्सूनची अक्षीय रेषा उत्तर दिशेत सरकेल आणि बिहार, उत्तर पश्चिम बंगाल व त्यानंतर अरुणाचल प्रदेशच्या जवळ पोहोचेल ज्यामुळे बिहार, आणि उत्तर पश्चिम बंगाल मध्ये पाऊस वाढेल. शिवाय, असम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम मध्ये हलका पाऊस सुरु राहील. याउलट, झारखंड, ओडिशा आणि गंगीय पश्चिम बंगाल मध्ये हवामान कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

उत्तर भारतात, पूर्व राजस्थान मध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. शिवाय, पंजाबच्या उत्तर पश्चिम भागात, तसेच हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश या ठिकाणी हलक्या पावसासह हवामान मुख्यतः कोरडेच राहणे अपेक्षित आहे. दिल्ली मधेही हवामान कोरडे राहील. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये तापमानात वाढ दिसून येईल. तथापि, दक्षिण हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आणि दक्षिण जम्मू काश्मीर मध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.

दक्षिण मध्ये, सक्रिय ट्रफमुळे गोवा, कर्नाटक आणि केरळ मध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि अंतर केरळ मध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू मध्ये पाऊस कमी होईल. चेन्नई मध्ये हवामान उष्ण राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com







For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories





latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×