Skymet weather

हवामान अंदाज 17 जुलै: मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस

July 16, 2019 5:38 PM |


एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तान आणि पंजाबवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा उत्तर पूर्व भारत पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय, राजस्थान, दिल्ली सह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे. जम्मू काश्मीर मध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो.

एक पूर्व पश्चिम ट्रफ रेषा बिहार पासून नागालैंड पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयी पश्चिम बंगाल, असम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालैंड मध्ये पावसाची शक्यता आहे. झारखंड आणि ओडिशा मध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

दक्षिण मध्ये, एक ट्रफ रेषा बिहार पासून आंध्र प्रदेश पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगाणा, रायलसीमा, आणि अंतर्गत तमिळनाडू मध्ये पावसाची शक्यता आहे. कर्णाटक आणि केरळ मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शक्ती. अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर पावसाचा जोर वाढेल.

मध्य भारतात, राजस्थान, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेश मध्ये हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय, छत्तीसगड आणि उत्तर कोंकण व गोवा मध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोंकण व गोव्यात चांगला पाऊस पडत राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try