Skymet weather

हवामान अंदाज 24 जुलै: कोंकण व गोव्यात जोरदार पाऊस, मुंबई मध्ये पाऊस वाढणार

July 23, 2019 6:20 PM |


एक चक्रवाती परिस्थिती पूर्व उत्तर प्रदेश आणि लगतच्या बिहारवर बनलेली आहे. मान्सूनची अक्षीय रेषा पंजाब पासून उत्तर पूर्व भारता पर्येंत विस्तारलेली आहे. ज्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उप हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि असम मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. ओडिशा मध्ये विखुरलेल्या हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. गंगीय पश्चिम बंगाल मध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो.

दक्षिण मध्ये, एक ट्रफ रेषा उत्तर कोंकण व गोव्यापासून केरळ पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे कर्नाटक मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. केरळ मध्ये आता पावसाचा जोर कमी होईल परंतु मध्यम पाऊस सुरु राहील. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मध्ये विखुरलेल्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरु राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

मध्य भारतात, एक उत्तर दक्षिण ट्रफ रेषा पूर्व उत्तर प्रदेश पासून उत्तर अंतर्गत कर्नाटक पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे छत्तीसगड, उत्तर आणि उत्तर पूर्व मध्य प्रदेश मध्ये पावसाचा जोर वाढेल. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. पूर्व राजस्थान मध्ये एक दोन ठिकाणी पाऊस सुरु राहील. याउलट, पश्चिम राजस्थान मध्ये हवामान मात्र कोरडे राहील. एक आणखी ट्रफ रेषा उत्तर कोंकण व गोव्यापासून केरळ पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे कोंकण व गोव्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई मध्ये एक दोन ठिकाणी चांगला पाऊस पडेल.

उत्तर मध्ये एक चक्रवर्ती परिस्थिती मध्य पाकिस्तान आणि लगतच्या पंजाब मध्ये बनलेली आहे. मान्सूनची अक्षीय ट्रफ रेषा पूर्व भारता पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये पावसाचा जोर वाढेल. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर राजस्थान मध्ये पाऊस पडू शकतो.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try