Skymet weather

हवामान अंदाज 6 जुलै: विदर्भ आणि मराठवाड्यात हलका पाऊस, मुंबईत मध्यम पाऊस

July 5, 2019 8:05 PM |

मध्य भारतात, एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण पूर्व उत्तर प्रदेश आणि लगतच्या उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये बनलेला आहे, ज्यामुळे दक्षिण पूर्व राजस्थान, गुजरात, कोंकण व गोवा, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विखुरलेल्या हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि कछ मध्ये एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. मुंबई मध्ये मध्यम पाऊस पडत राहील.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक ट्रफ रेषा कमी दाबाच्या पट्ट्यापासून बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे. एक चक्रवाती परिस्थिती असमवर बनलेली आहे ज्यामुळे उत्तर पूर्व भारतात पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे. याशिवाय, बिहार, झारखंड, उप हिमलायी पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओडिशा मध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

उत्तर भारतात, एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थान मध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये जोरदार पावसाची अपेक्षा आहे. याउलट, जम्मू काश्मीर मध्ये हलका पाऊस पडत राहणे अपेक्षित आहे.

दक्षिण मध्ये, एक ट्रफ रेषा कर्नाटक पासून केरळ पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि केरळ मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. कर्नाटक मध्ये विखुरलेला पाऊस सुरु राहील. याउलट, रायलसीमा आणि तामिळनाडू मध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसासह बहुतांश ठिकाणी हवामान कोरडेच राहणे अपेक्षित आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories







The advantage of staying at home on a rainy day is that you can get comfortable, turn on your mobile, and get to play at a bitcoin casino with a cup of tea. While that heavy rain is falling, you get to play your favorite bitcoin casino games without any worry in the world. The advantage of playing in a crypto casino is that you can log in anywhere at any time.

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×