हवामान अंदाज 9 जून: केरळात मॉन्सून २०१९ चे आगमन, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र मध्ये पाऊस

June 8, 2019 10:02 PM|

दक्षिण पश्चिम मॉन्सून २०१९ चे केरळात आगमन झाले आहे. हवामान प्रारूपांच्या अनुसार देखील आगामी दिवसांत मान्सूनचा प्रवास संथ राहण्याची अपेक्षा आहे. एक चक्रवाती परिस्थिती अरब सागरावर बनलेली आहे. ही परिस्थिती लवकरच कमी दाबाच्या पट्ट्यात परिवर्तित होईल. ही परिस्थिती उत्तर दिशेत पुढे जाईल ज्यामुळे लक्षद्वीप मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, केरळ आणि दक्षिण आंतरिक कर्नाटक मध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. तामिळनाडूवर पावसाचा जोर कमी होईल. आंध्र प्रदेश आणि रायलसीमा मध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तेलंगाणाच्या तापमानात किंचित घट दिसून येईल.

एक चक्रवाती परिस्थिती असमवर बनलेली आहे. दक्षिण दिशेने वारे देखील वाहत आहे. याशिवाय, एक ट्रफ रेषा उत्तर पश्चिम भागांपासून ओडिशा पर्यंत विस्तारलेली आहे ज्यामुळे उत्तर पूर्व राज्यांवर पावसाची शक्यता आहे. बिहार, पश्चिम बंगालच्या मध्य व पूर्व भागात व झारखंड आणि ओडिशा मध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारतात, पश्चिमी विक्षोभ पुढे चालला आहे ज्यामुळे उत्तर भारताच्या तापमानात वाढ दिसून येईल. तथापि, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. एक ट्रफ रेषा मध्य पाकिस्तान पासून ओडिशा पर्यंत विस्तारलेली आहे ज्यामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली मध्ये हवामान गरम आणि कोरडे राहील. दिल्ली मध्ये बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

मध्य भारतात तापमानात घट दिसून येईल. दक्षिण छत्तीसगड, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. गुजरात मध्ये उष्णतेच्या लाटांपासून सुटका मिळेल. याशिवाय, दक्षिण पश्चिमी दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात घट दिसून येईल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

author image