हवामान अंदाज 20 मे: दक्षिण पश्चिम मॉन्सून चे अंदमान व निकोबारवर आगमन, दक्षिण व उत्तर पूर्व भारतात पाऊस

May 19, 2019 7:25 PM |


दक्षिण-पश्चिम मॉन्सून २०१९ चे आगमन अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर झाले आहे. मॉन्सूनने दोन दिवस आधीच येऊन, दक्षिण अंदमान सागर आणि दक्षिण बंगालच्या खाडी व निकोबार द्वीपसमूहापासून आपला प्रवास सुरु केला आहे. कर्नाटक, केरळ आणि पश्चिम तामिळनाडू मध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश मध्ये ही एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण अंदमान सागरावर बनलेली आहे. याशिवाय, द्वीपसमूहावर दक्षिण पश्चिम दिशेने वारे वाहत आहे ज्यामुळे, येथे ढगाळ आकाशासह पावसाची सुरुवात झाली आहे
मॉन्सूनची उत्तर सीमा कार निकोबार ला पार करून जाते आहे.

अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर चक्रवाती परिस्थिती बनलेली आहे, ज्यामुळे येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

दक्षिण भारतात, एक चक्रवाती परिस्थिती उत्तर आंतरिक कर्नाटक मध्ये बनलेली आहे. एक दुसरी चक्रवाती परिस्थिती कॉमोरीन क्षेत्रावर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा दक्षिण आंतरिक कर्नाटक आणि आंतरिक तामिळनाडू पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे कर्नाटक, केरळ आणि पश्चिम तामिळनाडू मध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश मध्ये ही एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती पूर्व बिहारवर बनलेली आहे. याशिवाय, एक अजून चक्रवाती परिस्थिती असमवर बनलेली आहे, ज्यामुळे पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि उत्तर पूर्व राज्यांवर पावसाची शक्यता आहे. ओडिशा मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे.

मध्य भारतात, उत्तर पश्चिम दिशेने कोरडे वारे वाहत आहे. येथे तापमानात पण वाढ दिसून आली आहे. येणाऱ्या २४ तासात, दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढ मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India Rain in India  

उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ उत्तर जम्मू काश्मीरवर बनलेला आहे, ज्यामुळे, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याउलट, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थान मध्ये हवामान मात्र कोरडेच राहणार ज्यामुळे तापमानात वाढ दिसून येईल. याउलट, एक चक्रवर्ती परिस्थिती दक्षिण पश्चिम राजस्थानवर बनलेली आहे, ज्यामुळे दक्षिण राजस्थान मध्ये काही ठिकाणी धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
In the last 24 hours from 8.30 am on Friday, Dahanu in #Maharashtra has been the rainiest place in India with 216 m… t.co/ksasbSwN2T
Sunday, September 15 12:03Reply
#Dharamsala holds an important place weather-wise as India is going to play its opener #T20I against South Africa t… t.co/5ZkSjqbg3b
Sunday, September 15 11:34Reply
During the next 24 hours, heavy #rains and #thundershowers are expected at isolated places over North… t.co/Gu89yWCQoN
Sunday, September 15 10:51Reply
#Mumbai #rains to the tune of 31 mm were recorded in a span of 24 hours from 8:30 am on Saturday… t.co/HcXQWfSlsM
Sunday, September 15 10:07Reply
Looking at the available data for last 21 hours, the city of #Indore received 24 mm of rain, Guna received 6 mm, Ra… t.co/SCSLtNEHuv
Sunday, September 15 09:54Reply
(3/n) #WeatherAlert for #Gujarat: Few spells of rain and thundershower will occur over Navsari, Panch Mahals, Patan… t.co/5vJXeWpiH3
Sunday, September 15 09:24Reply
(2/n) #WeatherAlert for #Gujarat: Few spells of rain and thundershower will occur over Devbhumi Dwarka, Dohad,… t.co/oiBOLLMnoU
Sunday, September 15 09:23Reply
(1/n) #WeatherAlert for #Gujarat: Few spells of rain and thundershower will occur over #Ahmadabad, Amreli, Anand, A… t.co/xxq3vSva4J
Sunday, September 15 09:22Reply
Sunday, September 15 08:56Reply
Saturday, September 14 21:53Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try