हवामान अंदाज 31 मे: नागपूर, चंद्रपूर, अकोला, वर्धा, औरंगाबाद, नांदेड, लातूर आणि मालेगाव मध्ये तीव्र उष्णतेची लाट

May 30, 2019 8:06 PM |

मध्य भारतात, पूर्व मान्सूनच्या पावसाच्या अनुपस्थितीत, संपूर्ण महाराष्ट्रात हवामान गेल्या अनेक दिवसांपासून गरम राहिले आहे. सध्या उत्तरपश्चिमी दिशेने गरम वारे वाहत आहेत, ज्यामुळे राज्यातील बर्याच भागांमध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे. विदर्भातील काही भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटांची स्थिती चालू आहे. चंद्रपूर आणि नागपूर मध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. नागपूर, चंद्रपूर, अकोला, वर्धा, औरंगाबाद, नांदेड, लातूर आणि मालेगाव या ठिकाणी रहिवाशांना उष्णतेच्या लाटांपासून त्रास होईल. येथे, किमान तापमान सुद्धा ३० अंशाचा वर राहील. दिवस आणि रात्री दोन्ही तापमान सामान्यपेक्षा जास्त नोंदवले जातील आणि रहिवाशांना त्रास सहन करावा लागेल, असे दिसून येत आहे॰

उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तान आणि लगतच्या जम्मू काश्मीरवर बनलेला आहे ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय, एक चक्रवाती परिस्थिती, उत्तर पाकिस्तान आणि लगतच्या उत्तर पश्चिम राजस्थानवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा पश्चिम उत्तर प्रदेश पासून उत्तर पूर्व भारता पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे राजस्थान मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि उत्तर प्रदेश मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

पूर्व आणि उत्तर पूर्व राज्यात, एक ट्रफ रेषा उत्तर प्रदेश पासून उत्तर पूर्व भारता पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम आणि पूर्व बिहार व ओडिशा मध्ये पावसाची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

दक्षिण भारतात, एक उत्तर दक्षिण ट्रफ रेषा पूर्व बिहार पासून दक्षिण आंतरिक कर्नाटक पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे दक्षिण आंतरिक कर्नाटक, रायलसीमा, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर आंतरिक कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये पावसाची शक्यता आहे. अंदमान व निकोबार द्वीपसमूहवार जोरदार पावसाची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories
Weather on Twitter
#Hindi: नया वेस्टर्न डिस्टर्बेंस और हल्की हवाए बढ़ाएंगी दिल्ली का प्रदूषण | 23 नवंबर से राहत मिलने की संभावनाI… t.co/vNox9kgnAW
Tuesday, November 19 14:15Reply
अगले 24 घंटों के दौरान, इन तमाम कारणों की वजह से प्रदूषण में मामूली वृद्धि की आशंका है। इतना ही नहीं कल यानि 20 नवं… t.co/ibqhfa4bH0
Tuesday, November 19 13:55Reply
उत्तर भारत में इस सप्ताह के शुरुआती दिनों में खासकर जब तक कोई पश्चिमी विक्षोभ नहीं आता, मौसम शुष्क रहेगा और अगला प… t.co/V4ptzkiZ8l
Tuesday, November 19 13:30Reply
अगले 24 घंटों के दौरान, दक्षिण तटीय आंध्र प्रदेश, तमिलनाडु, केरल, दक्षिण आंतरिक कर्नाटक में गरज के साथ हल्की से मध्… t.co/mGdlJENO3z
Tuesday, November 19 13:12Reply
Last evening, #Kutch in #Gujarat was jolted by a mild #earthquake of magnitude 4.3. However, there have been no rep… t.co/Ge6bcoRp3Q
Tuesday, November 19 13:11Reply
Scattered showers would keep appearing for another three to four days. #Chennai would record patchy light #rain wit… t.co/T1yXOdT7jS
Tuesday, November 19 12:15Reply
Siachen Avalanche: Despite best efforts, six casualties, which include four soldiers and two civilian porters succu… t.co/6IziE3iwB5
Tuesday, November 19 11:48Reply
Four soldiers from Dogra regiment and two civilian porters are among the dead. The avalanche struck them at an alti… t.co/8rBt5nninJ
Tuesday, November 19 11:46Reply
Minimums may fall further over the Northwest and Central India and over few pockets of East India. #DelhiPollutiont.co/ZGYqGclMdh
Tuesday, November 19 11:23Reply
Isolated light #rain and #snow can be seen over #ArunachalPradesh. Light rain is a possibility over #Assam and… t.co/T7hmag1QuU
Tuesday, November 19 11:15Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try