Skymet weather

हवामान अंदाज 13 जानेवारी: उत्तर मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता

January 12, 2020 6:02 PM |

एक पश्चिमी विक्षोभ पाकिस्तानच्या उत्तरेकडील भाग आणि जम्मू-काश्मीरच्या आसपासच्या भागांवर आहे. प्रभावाने चक्रवाती परिस्थिती पाकिस्तानच्या पूर्व-मध्य भाग आणि उत्तर पश्चिम राजस्थानच्या भागांवर आहे.ही प्रणाली पूर्व-ईशान्य दिशेने सरकत असल्याने, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड मध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे.हरियाणा आणि दिल्लीच्या आसपासच्या भागांमध्येही आणखी एक चक्रवाती परिस्थिती आहे. या प्रणालीमुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात एक दोन ठिकाणी गारपीटसह बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. ट्रफ रेषा उत्तर-पश्चिम राजस्थान ते उत्तर-पूर्व अरबी समुद्रापर्यंत विस्तारित आहे. यामुळे राजस्थान आणि हरियाणामध्ये विखुरलेला पाऊस पडेल.

मध्य प्रदेशच्या उत्तर भागात काही ठिकाणी पाऊस पडेल. तर तापमानात वाढीसह मध्य भारतातील इतर भाग जवळजवळ कोरडेच राहतील.ट्रफ रेषा उत्तर-पश्चिम राजस्थान ते अरबी समुद्राच्या ईशान्य भागापर्यंत विस्तारित आहे. या व्यवस्थेमुळे गुजरात मध्ये काही ठिकाणी तसेच, उत्तर कोकणातील एक दोन ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील लगतच्या भागात हलक्या वाऱ्यांसह हलका पाऊस पडेल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी हवामान जवळजवळ कोरडे व थंड राहील. दिवस आनंददायी असेल तर. पहाटे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये विखुरलेल्या ठिकाणी धुके असण्याची शक्यता आहे.हंगामी चक्रवाती परिस्थिती बांग्लादेशच्या पूर्वेकडील भाग आणि सखल भागातील आसपासच्या क्षेत्रात आहे ज्याचा हवामानावर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणूनच सकाळी आणि रात्रीच्या वेळी कोरडे व थंड हवामान सुरू राहील.

बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रापासून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रायलसीमा, तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टी भागात एक दोन ठिकाणी हलक्या सरी बरसतील. दक्षिण द्वीपकल्पातील बऱ्याच भागात हवामान जवळजवळ कोरडे राहील तर रात्री आनंददायी असेल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com







For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories






latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×