Skymet weather

हवामान अंदाज 2 मार्च: काश्मीर मध्ये पाऊस, मुंबईत हवामान कोरडेच

March 1, 2020 6:48 PM |

एक वेस्टर्न डिस्टर्बन्स जम्मू-काश्मीरच्या उत्तर भागांमध्ये आहे. या प्रणालीमुळे, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील उंच भागांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशाच्या उत्तर पश्चिम भागात कोरडे वारे वाहत आहेत, त्यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात कोरडे हवामान राहील. दिवसाचे तापमान किंचित वाढेल तर रात्रीचे तापमान कमी होईल.

मध्य भारतात, चक्रवाती परिस्थिती मध्य प्रदेशच्या उत्तर भागांवर आहे. एक ट्रफ रेषा दक्षिण मध्य महाराष्ट्र ते ईशान्य मध्य प्रदेश पर्यंत विस्तारित आहे. या प्रणालीच्या अस्तित्वामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या पूर्वेकडील भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेशात हवामान कोरडे राहील. मुंबईत कोरडे हवामान राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात हलका पाऊस पडेल. दिवसाचे तापमान काही अंशांनी कमी होऊ शकतात. चक्रवाती परिस्थिती आसाम आणि पश्चिम हिमालयीन पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांवर आहे. या व्यवस्थेमुळे, ईशान्य राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

दक्षिण मध्ये, एक ट्रफ केरळ ते दक्षिण मध्य महाराष्ट्र पर्यंत विस्तारित आहे. या प्रणालीमुळे केरळ, तामिळनाडूचा काही भाग आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या इतर भागात हवामान कोरडे राहील. दरम्यान, मराठवाडा व लगतच्या भागात चक्रवाती परिस्थिती आहे. या प्रणालीमुळे तेलंगणाच्या उत्तरेकडील भागात हलका पाऊस पडेल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







The advantage of staying at home on a rainy day is that you can get comfortable, turn on your mobile, and get to play at a bitcoin casino with a cup of tea. While that heavy rain is falling, you get to play your favorite bitcoin casino games without any worry in the world. The advantage of playing in a crypto casino is that you can log in anywhere at any time.

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try