Skymet weather

हवामान अंदाज 12 ऑक्टोबर: पुण्यात तीव्र सरींची शक्यता

October 11, 2019 6:10 PM |

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही भाग, संपूर्ण राजस्थान आणि कच्छ आणि गुजरात व सौराष्ट्रच्या काही भागांतून दक्षिण-पश्चिम मान्सूनने माघार घेतली आहे.

चक्रवाती परिस्थिती कोमोरिन क्षेत्रावर आहे आणि एक ट्रफ रेषा उत्तर अंतर्गत कर्नाटकपर्यंत विस्तारित आहे आणि दुसरी ट्रफ उत्तर ओडिशा ते रायलसीमापर्यंत विस्तारित आहे. म्हणूनच, आम्ही आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटकच्या काही भागांत एक ते दोन तीव्र सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची अपेक्षा करतो. केरळमध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आपल्या देशाच्या पूर्वेकडील भागात, चक्रवाती परिस्थिती उत्तर किनारपट्टीच्या ओडिशा आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या पश्चिमेकडे आहे. म्हणूनच ओडिशामध्ये एक किंवा दोन जोरदार सरींसह हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सिक्कीम व ईशान्य राज्यांत विखुरलेला पाऊस पडेल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशचे हवामान कोरडे राहील.आपल्या देशाच्या मध्य भागात, ज्यामध्ये गोवा किनाऱ्यापासून पूर्व-मध्य अरबी समुद्राच्यावर चक्रवाती परिस्थिती आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोवा येथे हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील.

तर उत्तर कोकण आणि गोवा, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहेपुण्यात काही भागांमध्ये तीव्र सरी दिसू शकतात, तर अल्प कालावधीसाठी स्थानिक हवामान क्रियाकलापांना नाकारता येत नाही.यावेळी नाशिक, नागपूर व अकोला कोरडे राहतील.

तसेच, पश्चिम राजस्थानवर विपरीत चक्रवाती परिस्थिती आहे, त्यामुळे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशचे हवामान कोरडे राहीलमान्सूनने संपूर्ण उत्तर पश्चिम भारतातून माघार घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही महत्तवपूर्ण हवामान क्रियाकल्पांची शक्यता नाही आहे. तथापि, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलका पाऊस पडू शकतो. दिल्ली आणि एनसीआरमधील प्रदूषण खराब श्रेणीत असेल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com







For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories






latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×