Skymet weather

हवामान अंदाज 15 ऑक्टोबर: दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण आणि गोवा येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस

October 14, 2019 6:35 PM |

दक्षिण छत्तीसगड, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण आणि गोवा येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल तर उत्तर छत्तीसगड, उर्वरित महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातचे हवामान कोरडे व उबदार राहील. भोपाळ, इंदूर, जबलपूर, अहमदाबाद कोरडे व उबदार असेल.

एक ट्रफ दक्षिण ओडिशा ते उत्तर तामिळनाडू किनाऱ्यापर्येंत विस्तारित आहे. बंगालच्या उपसागरापासून दमट वारे वाहत आहेत. म्हणूनच, आम्ही आंध्र प्रदेश, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, अंतर्गत तमिळनाडू आणि केरळच्या काही भागांत एक ते दोन तीव्र सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची अपेक्षा करतो. तेलंगाणा, तटीय कर्नाटक आणि किनारपट्टीच्या तमिळनाडूमध्ये एक-दोन मध्यम सरींसह हलका पाऊस संभव आहे.

आपल्या देशाच्या पूर्वेकडील आणि ईशान्य भागात, ओडिशात विखुरलेल्या हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडचे हवामान जवळजवळ कोरडे राहील. पश्चिम बंगालमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण आसाममध्ये चक्रवाती परिस्थितीमुळे मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. तर उर्वरित ईशान्य भारतात एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

दरम्यान, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण आणि गोवा येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल तर उत्तर छत्तीसगड, उर्वरित महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातचे हवामान कोरडे व उबदार राहील. भोपाळ, इंदूर, जबलपूर, अहमदाबाद कोरडे व उबदार असेल.

उत्तरेकडील, विपरीत चक्रवाती परिस्थिती पश्चिम राजस्थानवर आहे आणि उत्तर पश्चिम दिशेने कोरडे वारे वाहत आहे. म्हणून पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये हवामानाच्या कोणत्याही गतिविधीची अपेक्षा नाही आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या भागांवर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try