Skymet weather

हवामान अंदाज 17 सप्टेंबर: मुंबई, पुणे येथे हलका पाऊस तर नागपुरात मध्यम पावसाची शक्यता

September 16, 2019 8:49 PM |

पूर्व भागांत चक्रवाती परिस्थिती दक्षिण उत्तर प्रदेशात आहे आणि मान्सूनची अक्षीय रेषा हरियाणापासून उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारित आहे. त्यामुळे मध्य आणि पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात एक किंवा दोन जोरदार गडगडाटीसह मध्यम पाऊस पडू शकतो.

आसाम आणि अरुणाचल प्रदेश तसेच झारखंडच्या काही भागांत विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल. पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि ईशान्येकडील जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन मध्यम गडगडाटीसह हलका पाऊस पडेल.देशाच्या मध्य भागांत, उत्तर-दक्षिण ट्रफ रेषा दक्षिण उत्तर प्रदेश ते तेलंगणा पर्यंत विस्तारित आहे, त्यामुळे मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत एक किंवा दोन मुसळधार सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

दक्षिणपूर्व राजस्थान, कोकण, गोवा आणि दक्षिण गुजरातमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानसह सौराष्ट्र कच्छ जवळजवळ कोरडे होईल.मुंबई, पुणे येथे हलका पाऊस तर नागपुरात मध्यम पाऊस पडेल.

दक्षिण भारतात, एक अशक्त ट्रफ रेषा तामिळनाडूच्या किनाऱ्यापर्येंत विस्तारलेली आहे. म्हणून, किनारपट्टी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि तामिळनाडूच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोस्टल कर्नाटक, केरळ तसेच तेलंगणाच्या काही भागांतही हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहावर पाऊस मुसळधार असेल.उत्तर मध्ये एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे, ज्यामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. याउलट, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर राजस्थान तसेच पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये हवामान कोरडे राहील. तथापि, एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. हवामान मुख्यतः दमट आणि गरम राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com







For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories






latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×