Skymet weather

[Marathi] नागपूर,अकोला येथे शुष्क हवामान, रब्बी पिकाची कापणी करावी

February 23, 2018 5:29 PM |

Nagpur post

विदर्भात कोरड्या हवामानामुळे  स्वच्छ सूर्यप्रकाश आणि आकाश निरभ्र राहिले. निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळेदिवस आणि रात्रीच्या तापमानात  वाढ  झाली असून,  तापमान सरासरीच्या वर नोंदले गेले. सध्या कमाल आणि  किमानतापमानातं  सरासरीच्या तुलनेत  २-४ अंश सेल्सिअस ने  वाढ झाली.

काल सुद्धा, बऱ्याच केंद्रावर कमाल तापमान  सरासरीच्या जवळपास व ३५°C  च्या वर  नोंदले गेले. वर्धा येथील  दिवसाचेउच्चतम तापमान  ३५.२°C,तर  नागपूर येथील तापमान ३४. ८°C  इतके  नोंदले गेले. त्यासोबतच  बुलढाणा आणि  यवतमाळयेथील तापमान ३४. ५°C  एवढे  नोंदले  गेले.

स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार,  सध्या  कोणतीही  विशिष्ट हवामान  प्रणाली विदर्भातील  भागावर  नाही.  ज्यामुळे पुढील  ३-४ दिवस  तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील.  त्यानंतर २७ फेब्रुवारीच्या  आसपास  तुरळक ठिकाणीविजेच्या  गडगडाटासह  पाऊस  पडायची शक्यता आहे.

[yuzo_related]

पुढील आठवड्यात पडणारा अवकाळी पाऊस हा काही भागातच  पडणार  असून, त्यामुळे  तापमानातं  मोठी घट होण्याची  शक्यता नाही. पण हा  कालावधी गारपीट होण्यास पोषक असून  विदर्भात  गारपीट होण्याची शक्यता  नाकारता येत नाही.

पुढील आठवड्यात होणारा  तुरळक  पाऊस आणि गारपीट हि उत्तर विदर्भ भागापुरतीच मर्यादित  राहील. अकोला  नागपूर,गोंदिया  ह्या भागात  विजेच्या  गडगटासह  अवकाळी पाऊस  पडेल इतर  तर, भागात हवामान  कोरडे राहील.

शेतीसाठी शिफारस

येत्या  २-३ दिवसात  कोरडे आणि उष्ण  हवामानामुळे , शेतकरी  बांधवानी  गहू आणि उशिरा  लागवड केलेल्या  हरभऱ्याची  कापणी  करून  सुरक्षित ठिकाणी  ठेवावी. कापणी झालेली जमीन नांगरून, स्वच्छ करून , उन्हास तापू द्यावी. त्यासोबतच  २७फेब्रुवारी पूर्वी  पक्व  असलेल्या  संत्रा, डाळिंब, इतर  फळाची  काढणी करावी. गरजेनुसार  संत्रा आणि डाळिंब  फळबागेस  पाणीद्यावे, जेणेकरून फुलगळ आणि फळगळ  होणार नाही.

Image Credit:             

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try