>  
[Marathi] कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात परत एकदा पाऊस होण्याची शक्यता ; काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावी

[Marathi] कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात परत एकदा पाऊस होण्याची शक्यता ; काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावी

04:14 PM

marathi p

महाराष्ट्राला चार विभागा मध्ये विभागलेले आहे आणि प्रत्येक भाग वेगवेगळ्या हवामानाचा अनुभव घेत आहे. कोकण विभागात एक महिन्यापेक्षा अधिक काळ कोरडे हवामान होते अत्तापर्यंत , तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र ह्या तीन विभागामध्ये तुरळक असा पाऊस झालेला आहे.

गेल्या 24 तासात सुध्दा काहीच फरक पडलेला नाही ,मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये हलकासा पाऊस झाला तर ,कोकण मध्ये हवामान कोरडे होते . रविवारी 08:30 पासुन पुढच्या २४ तासामध्ये, वर्धा येथे ११ मिमी पाऊस, यवतमाळ ४ मिमी, ब्रम्हपुरी ३ मि.मी., सातारा ०.३ मिमी एवढा पाऊस नोंदविला गेला. दरम्यानच्या काळात गोंदिया आणि नागपूरमधे हलक्याश्या पावसाची नोंद झाली.

Related Post

या पावसाचे कारण कमी दाबाचा निर्माण झालेला पट्टा असु शकते , कि ज्यामुळे वारे अता पूर्व उत्तर प्रदेश मधुन कर्नाटक कडे वाहत आहे व जाताना ते विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र ओलांडून जातात.
स्काय मेट हवामान अंदाजानुसार हा कमी दाबाचा पट्टा व त्यामुळे निर्माण होणारे वारे सध्या उत्तर राजस्थान कडून कर्नाटकच्या सागरी कीनारपट्टीकडे वाहतील व ते जाताना मध्य महाराष्ट्र ओलांडुन जातील. यामुळे येत्या २४ तासांत विदर्भातील पावसाची तीव्रता कमी होण्याची आशा आहे. तथापि, मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पाऊस होऊ शकतो.

परंतु कोकण चे हवामान कोरडेच राहील, तसेच विदर्भातील काही प्रमाणात कमी झालेले तापमान पुन्हा वाढू शकते .त्यामुळे, जेऊर, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा आणि सोलापूर या शहरांमध्ये पाऊस होऊ शकतो,दुसरीकडे, मुंबई, नाशिक, पुणे आणि नागपूरमध्ये हवामान कोरडे व उष्ण राहील.

हवामानाचा कृषी घटकावर होणारा परिणाम पाहु:

कोरडे हवामान सतत असल्यामुळे विदर्भातील शेतकरी बांधवाना सल्ल्ला देण्यात येत आहे की गरजेनुसार उन्हाळी पिके, भाजीपाला आणि फळे यांना पाणी द्यावे. उच्च तापमान लक्षात घेता शेतकरी मित्रांनी उसाला आच्छादन (मल्चिंग ) करावे. कोकणातील हवामान कोरडे राहील शेतकऱ्यांनी पिकलेल्या आंब्याची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करून, आंबे सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे. तापमानात फरक असल्याने, संत्र्यामध्ये मध्ये अकाली फळ गळती होण्याची शक्यता आहे , म्हणून योग्य फवारणी आणि काळजी घ्यावी.

Image Credit: DNA India             

Any information taken from here should be credited to skymetweather.com