[Marathi] मध्य भारत आणि द्वीपकल्पाच्या भागातील पावसाची कमतरता बऱ्याच प्रमाणात भरून निघाली

September 23, 2015 4:27 PM |

Rain in Karnatakaजुलै आणि ऑगस्ट महिन्यात भारताच्या दक्षिणी द्वीपकल्पाच्या भागासह महाराष्ट्र आणि तेलंगाना येथे अगदीच कमी पाऊस झाल्याने तेथील पावसाच्या कमतरतेचे प्रमाण खूपच जास्त होते. दिनांक १ सप्टेंबरला उत्तर कर्नाटकातील पावसाची तुट ४३% होती, परंतु दिनांक १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस होऊन हे प्रमाण कमी होऊन २४% झाले आहे.

तसेच मराठवाड्यातील पावसाची कमतरताही ५१% वरून कमी होऊन ३६% झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही दिनांक १ सप्टेंबरला पावसाची तुट ४१% होती परंतु गेल्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे हे प्रमाण २८% झाले आहे.

रायलसीमा येथेही २०% पावसाची कमतरता होती पण आता ९% इतकीच आहे. तेलंगाणा येथेही दिनांक १ सप्टेंबरला पावसाच्या कमतरतेचे प्रमाण २५% होते आता मात्र १८% झाले आहे तसेच विदर्भातही १३% होते सध्यस्थितीत मात्र ८% झाले आहे

मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात गेल्या आठवड्यात चांगलाच पाऊस झाल्याचे वरील आकडेवारीवरून कळून येते. तसेच उत्तर कर्नाटकातही चांगला पाऊस झाला असल्याचे लक्षात येते.

क्षेत्रफ़ळाच्या विचार करता महाराष्ट्र हा फार मोठा भाग असल्याने तेथे झालेल्या भरपूर पावसामुळे संपूर्ण देशातील पावसाच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात फरक पडतो.

सध्या सुरु असलेल्या पावसामुळे त्या भागातील पावसाची कमतरता भरपूर प्रमाणात भरून निघते आहे. द्वीपकल्पाच्या भागात दिनांक १ सप्टेंबरला पावसाच्या कमतरतेचे प्रमाण २१% होते आणि दिनांक २२ सप्टेंबर रोजी ते १५% झाले आहे. तसेच मध्य भारतातही १५% वरुन १३% झाले आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर हे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आणि ते छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात वरून पुढे सरकले त्यामुळे या भागात आणि मध्य भारतात चांगला पाऊस झाला.

आता मध्य भारतातील वातावरणातील बदल हे कमी झालेले आहेत. तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि चक्रवाती अभिसरण यामुळे दक्षिणी द्विप्काल्पाच्या टोकाचा भाग म्हणजेच तामिळनाडू, दक्षिण कर्नाटकाचा भाग आणि केरळ येथे येत्या ४८ तासात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

 

Image Credit: oneindia.com


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
Check out the day and night temperatures for major cities of India on October 15. #WeatheringWithYout.co/RQLXrDuVsg
Tuesday, October 15 12:53Reply
Isolated #rains are likely in #Telangana, South #Konkan, and #Goa, #Odisha, South #Chhattisgarh as well as Northeas… t.co/Iz5gjDGV84
Tuesday, October 15 11:30Reply
Scattered light to moderate showers would be seen over #Karnataka and #AndhraPradesh. t.co/ARrCUARxgk
Tuesday, October 15 11:20Reply
Moderate #rains with one or two heavy spells are likely in #TamilNadu and #Kerala. t.co/ARrCUARxgk
Tuesday, October 15 11:15Reply
RT @JATINSKYMET: #Thankyou @vinsonkurian for this conversation on #monsoon2019, this year came with its own challenges and broke many recor…
Tuesday, October 15 10:51Reply
Moderate to heavy #rains have battered #Kerala with #Kochi recording 76 mm and #Alappuzha 36 mm of rain in a span o… t.co/Ai9aRPVA4u
Tuesday, October 15 09:24Reply
A spike in #Delhi #pollution is expected from the fourth week of #October #DelhiPollution #AirPollution #weathert.co/VRUbET4YV8
Tuesday, October 15 08:51Reply
#WeatherForecast Oct 15: Onset of Northeast Monsoon anytime soon, #AQI of #Delhi and NCR slips further" on YouTube t.co/OaSfQV4I4k
Monday, October 14 22:31Reply
हवामान अंदाज 15 ऑक्टोबर: दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण आणि गोवा येथे हलका ते मध्यम पाऊस:… t.co/AuSmNY5UJa
Monday, October 14 22:00Reply
दिल्ली एनसीआर में हवा की गुणवत्ता और हुई ख़राब: t.co/OvS1z6LqcP #Hindi #Delhi #Delhipollution
Monday, October 14 21:31Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try