Skymet weather

[Marathi] अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून या वर्षातील दहावे चक्रीवादळ बनण्याची शक्यता

December 9, 2019 4:03 PM |

cyclone

आधीच वर्तविलेल्या अंदाजानुसार, नैऋत्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्ट्याच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. हि प्रणाली पश्चिम/वायव्य दिशेने १९ किमी प्रतितास वेगाने पुढे सरकत असून सध्या अक्षांश १०.३ अंश उत्तर आणि रेखांश ६० अंश पूर्वेस आहे. येमेन, सॉकोत्रा बेटाच्या अंदाजे ७१० किमी पूर्व-आग्नेय दिशेस आणि केरळच्या कोचीनच्या पश्चिम-वायव्येस १७८० किमी अंतरावर आहे.

स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांच्या मते, वातावरणातील दोन थरांमधील वाऱ्यांच्या वेगातील कमी तफावत आणि उबदार तापमान असलेली समुद्राची परिस्थिती या प्रणालीच्या अधिक तीव्रतेसाठी अनुकूल आहे. तथापि, ही यंत्रणा तीव्र होऊन चक्रीवादळामध्ये रूपांतरित होते की नाही हे आताच सांगणे फार घाईचे होईल.

आज संध्याकाळपर्यंत तीव्र कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल, परंतु नंतर पश्चिम-नैऋत्य दिशेने सोमालियाकडे वळेल.

ही प्रणाली भारतीय किनाऱ्यापासून सुमारे २००० किमी अंतरावर आहे. म्हणूनच, भारतीय मुख्य भूमीवर कोणत्याही मोठ्या हवामानविषयक गतिविधींची अपेक्षा नाही. तथापि, अरबी समुद्रामध्ये लागोपाठ शक्तिशाली प्रणालींच्या निर्मितीमुळे दक्षिण द्वीपकल्पात ईशान्य मॉन्सून कमकुवत झाला आहे. हवामानतज्ञांच्या मते, ही प्रणाली जवळपासच्या प्रदेशातील वाऱ्यांची गतिविधी नियंत्रित करते परिणामी आर्द्र वारे या प्रणालीभोवती केंद्रित होत असून त्यामुळे दक्षिणेकडील प्रदेशातील वातावरण कोरडे होत आहे.

सध्या मॅडन-ज्युलियन ऑसीलेशन ने (एमजेओ) दुसऱ्या चरणात अर्थात नैऋत्य हिंद महासागरात प्रवेश केला आहे, तर हिंद महासागर डायपोल (आयओडी) देखील सकारात्मक आहे. या दोन प्रमुख सागरीय मापदंडांच्या प्राबल्यामुळे, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा अधिक उबदार होते, परिणामी लागोपाठ सशक्त हवामान प्रणाली विकसित होतात.

यावर्षी आतापर्यंत अरबी समुद्रात लक्षणीय हवामान प्रणालींची निर्मिती झाली. कमी दाबाच्या पट्ट्याच्या तीव्रतेत आणखी वाढ होऊन चक्रीवादळ बनल्यास २०१९ मध्ये अरबी समुद्रामधील हे सातवे चक्रीवादळ ठरेल. सहाव्या चक्रीवादळ 'पवन' ने एकाच वर्षात सर्वाधिक विकसित होण्याचा सर्वकालिन विक्रम नोंदविला आहे. तर, यामुळे २०१९ मधील भारतीय समुद्रातील चक्रीवादळाची संख्याही दहापर्यंत वाढेल, जे १९७५ नंतर एका वर्षात सर्वाधिक चक्रीवादळ नोंदवणारे वर्ष असेल.

Image Credits – The Economic Times 

Any information taken from here should be credited to Skymet WeatherFor accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×