Skymet weather

[Marathi] महाराष्ट्रात एकीकडे पूर तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थिती

August 11, 2019 1:42 PM |

Maharashtra weather

निसर्गाच्या मनात महाराष्ट्राबद्दल काय विचार आहे याची खात्री नाही, कारण एकाच वेळी राज्यात पूर आणि दुष्काळी परिस्थिती आहे.

एकीकडे जेथे विनाशकारी पुरामुळे दोन लाखाहून अधिक लोकांना हलविण्यात आले असून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे, तर दुसरीकडे मराठवाड्याच्या दुष्काळी प्रदेशात मेघ-बीजारोपण चालू आहे, जिथे जवळजवळ सर्व धरणांमध्ये सध्या शून्य पाणीसाठा आहे.

परिस्थितीचे गांभीर्य पाहता सरकारने शुक्रवारी मेघ-बीजारोपण / क्लाउड सीडिंग ऑपरेशन सुरू केले. यापूर्वी दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रक्रियेत विमान आणि सी बँड डॉप्लर रडारचा समावेश आहे आणि या प्रयोगामुळे अशी आशा आहे की यामुळे दुष्काळ निर्माण होण्याच्या आणखी एका परिस्थितीला प्रतिबंध होईल.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य अतुल देउळगावकर यांच्या शब्दांत, “हे प्रयत्न जूनमध्येच सुरु करणे अपेक्षित होते कारण आता मेघ बीजारोपणासाठी चांगल्या ढगांची कमतरता आहे. आम्ही औरंगाबादपासून ४० कि.मी. अंतरावर मेघ बीजारोपणाच्या प्रयत्नात आहोत आणि निकालांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. "

मराठवाड्यातील जवळपास ८ जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यादीत मांजरा, माजलगाव, तेरणा, कोळेगाव आणि दुधना या मोठ्या धरणांच्या नावांचा समावेश आहे ज्यात पाणी नाही.

औरंगाबादच्या पैठणमधील केवळ जायकवाडी धरणात ६९.१२ टक्के पाणीसाठा आहे. या मागील प्रमुख कारण नाशिकमधील गोदावरी खोऱ्यात झालेला मुसळधार पाऊस आहे. मराठवाड्याचा मोठा भूभाग गोदावरी खोऱ्यात येतो.

८ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसामुळे राज्यात ३२% पावसाचे आधिक्य आहे आणि याउलट दुसरीकडे मराठवाड्यातील सात जिल्ह्यांत (औरंगाबाद वगळता) पावसाचे दुर्भिक्ष आहे.

Image Credits – The Indian Express

Any information taken from here should be credited to Skymet Weather


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
RT @Mpalawat: Heavy #rains continues over #Kerala. #Cochin 151 mm, #Karipur Airport 128 mm, #Kozhikode 114, #Cannur 49 mm and #Punalur rece…
Sunday, August 11 13:09Reply
#Weather alert for #Odisha Light to moderate #rain and #thundershowers at many places with heavy showers at some pl… t.co/a4zidcDFwS
Sunday, August 11 12:10Reply
In the last 24 hours from 8.30 am on Saturday, Naliya in #Gujarat has been the rainiest place in India with 275 mm… t.co/sqoqX8FjHR
Sunday, August 11 11:24Reply
Not sure what the mother nature has in store for #Maharashtra, as the state is reeling under floods and drought sit… t.co/POJrYhZPxa
Sunday, August 11 10:33Reply
#flood situation will persist in #Gujarat for another 24 to 36 hours #GujaratFloods #GujaratRains #GujaratRain t.co/jqQTeRLFrA
Sunday, August 11 09:55Reply
15 और 16 अगस्त को बिहार के लगभग सभी जिलों में चाहे पूर्व में किशनगंज, अररिया, पूर्णिया, कटिहार, भागलपुर हों या दक्… t.co/fgagjLg0so
Saturday, August 10 22:19Reply
During the next 24 hours, Vigorous #Monsoon conditions are likely over West #Gujarat, Kutch, Coastal Karnataka, and… t.co/78XaVwzSAY
Saturday, August 10 22:03Reply
वर्तमान में, तेज़ हवाओं और नमी के कारण, दिल्ली क्षेत्र पर सुबह और रात के समय बादल छाए रहने की उम्मीद है। इसके साथ,… t.co/96OYIrBF4A
Saturday, August 10 20:00Reply
RT @Mpalawat: Now #rains will be heavy over south #Sindh in #Pakistan for next 24 to 36 hours. @SkymetWeather
Saturday, August 10 19:32Reply
Fifteen sluice gates of the Bargi dam built on the river #Narmada in #Jabalpur district were opened following inces… t.co/7XdnRiVHcf
Saturday, August 10 19:30Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try