>  
[Marathi] मुंबईतील कमाल तापमान 2 अंशांनी अधिक, हवामान कोरडेच राहणे अपेक्षित

[Marathi] मुंबईतील कमाल तापमान 2 अंशांनी अधिक, हवामान कोरडेच राहणे अपेक्षित

06:27 PM

marathi website

मागील 24 तासांत दक्षिण मध्य-महाराष्ट्र आणि कोकण- गोव्यावर विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात आलेली असून उर्वरित भाग मात्र कोरडेच राहिलेले आहेत.

मुंबईतील कमाल तापमान 2 अंशांनी अधिक आहे ज्यामुळे वातावरणात गर्मी आणि आर्द्रता पसरलेली आहे .सध्या तरी, येणाऱ्या दिवसात अस्वस्थ हवामानाच्या परिस्थितीतून मुंबईकरांची सुटका होण्याची शक्यता नाही.

तसेच, कोकण-गोवा, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात देखील दिवसाचे तापमान 2-3 अंश सेल्सिअसने जास्त आहे, याउलट मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमानात २-३ अंशांनी घट दिसून आलेली आहे.

सध्या कोकण किनारपट्टी लगत एक कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे ज्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.परंतु 24 तासांनंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणे अपेक्षित आहे

Image Credits –Adventure Nation

Any information taken from here should be credited to Skymet Weather