Skymet weather

[Marathi] एल निनोच्या तावडीतून मान्सूनची सुटका, एल निनो तटस्थ होण्याच्या मार्गावर

August 27, 2019 2:29 PM |

El NINO

विषुववृत्तीय समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात (एसएसटी) सतत होणारी घसरण एल निनोच्या परिस्थितीत होणारी घट दर्शवित आहे. ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की पूर्व प्रशांत महासागरात एसएसटी सामान्यपेक्षा कमी आहे तर मध्य आणि पश्चिम प्रशांत महासागरात सरासरीपेक्षा जास्त आहे.हा चढउतार म्हणजे हळूहळू ENSO तटस्थ परिस्थितीकडे वाटचाल करत आहे. याचा अर्थ असा आहे की आता एल निनो पासून नैऋत्य मॉन्सून मुक्त झाला आहे.

जरी चांगल्या पावसाशी संबंधित इतर समुद्री घटक देखील अस्तित्त्वात असले, तरी एल निनो हा एक घटक सर्व गोष्टींवर मात करण्यास सक्षम आहे. एल निनोच्या घटत्या प्रभावामुळे, आयओडी (इंडियन ओशन डीपोल) निर्देशांक जो सध्या सकारात्मक तसेच मजबूत आहे, तो प्रबळ बनला आहे. याचा परिणाम म्हणून, गेल्या काही दिवसांपासून देशात जोरदार पाऊस पडत आहे. २६ ऑगस्टपर्यंत, देशभरात एकूण पर्जन्यमानात १% चे आधिक्य आहे.

हवामानतज्ज्ञांच्या मते एसएसटीतील घट यासोबत महासागरातील वरच्या थरातील उष्णतेचे प्रमाणही कमी झाले आहे. अशाप्रकारे, ढग आणि पावसाळी गतिविधी एल निनो तटस्थ परिस्थितीजवळ येण्याकडे सूचित करीत आहे.

सलग तिसर्‍या आठवड्यात एसएसएसटीमध्ये घट होत आहे. खरं तर, गेल्या आठवड्यात लक्षणीय घसरण दिसून आली ज्यामध्ये एसएसटी ०.४ अंशावरून ०.१ अंशापर्यंत खाली गेले. जरी काही चढउतार होत आहेत तरी आधी सारखीच परिस्थिती सुरु राहण्याची शक्यता आहे. परंतु तत्सम पॅटर्न सुरूच राहण्याची शक्यता आहे. हवामान प्रारूपे असे सूचित करतात की एल निनोची संभाव्यता ३०% पेक्षा कमी आहे आणि पुढे देखील संभाव्यता कमी आहे.

निनो ३.४ क्षेत्रामधील एसएसटी विसंगतीमुळे तीन महिन्यांपर्यंत चालणारे ओशनिक निनो इंडेक्स (ओएनआय) ०.५ अंश सेल्सियसच्या खाली असताना तटस्थ स्थिती घोषित केली जाते. मे-जून-जुलै साठी नवीनतम मूल्य ०.५ अंश सेल्सियस आहे आणि पुढील भागात म्हणजेच जून-जुलै-ऑगस्ट मध्ये सरासरीपेक्षा कमी होण्याची अपेक्षा करतो.

Image Credits – Deccan Herald

Any information taken from here should be credited to Skymet Weather
For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×