Skymet weather

[Marathi] विदर्भ, मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये पुन्हा उष्णतेची लाट, १० मे नंतर तापमान कमी होणार

May 6, 2019 9:34 PM |

Heatwave

मध्य भारतात प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील बरेच भाग एप्रिलमध्येच उष्ण वातावरणाशी लढत होते. खरं तर, या राज्यांतील काही भाग तर तीव्र उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाखाली होते.

त्यानंतर, दोन वेगवेगळ्या हवामानाच्या गतीविधींमुळे बहुतेक ठिकाणी तापमान कमी झाले. यामुळे संपूर्ण मध्य भारतातील उष्णतेची लाट कमी झाली.

तसेच अरबी समुद्रावरून आलेल्या आर्द्र वाऱ्यांमुळे राजस्थान, गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये तापमान कमी झाले. तथापि, चक्रीवादळ फनीच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या खाडीतून आलेल्या आर्द्र वाऱ्यांमुळे विदर्भ आणि मराठवाडा देखील प्रभावित झाले.

Also read: Heat wave returns to Maharashtra as temperatures soar above 45 degrees, relief around May 10

दरम्यान आता फनी चक्रीवादळ संपलेले असून उत्तर-पश्चिम दिशेने म्हणजेच अत्यंत गरम हवामान असलेल्या पाकिस्तान आणि राजस्थानमधून येणाऱ्या कोरड्या आणि गरम वाऱ्यांनी पुन्हा एकदा भारताच्या मध्यवर्ती भागातील राज्यांवर पुनरागमन केले आहे.

विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट आधीच परत आली आहे. यासह, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील उर्वरित भागांमध्ये देखील तापमान हळूहळू वाढत आहे. जेव्हा दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते आणि सामान्यपेक्षा ४-५ अंशांनी जास्त होते तेव्हा उष्णतेची लाट घोषित केली जाते. उपरोक्त उल्लेखित क्षेत्रांतील तापमान सामान्य असून ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे.

सध्या वाहत असलेल्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे राजस्थानसह, पश्चिम व दक्षिण मध्यप्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. तसेच दक्षिण मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येऊ शकते.

सद्य हवामानाची स्थिती पाहता हि उष्णतेच्या लाटेची परीस्थिती दीर्घ काळ टिकणार नाही, कारण पूर्व-मॉन्सून गतिविधींना १० किंवा ११ मे पासून मध्य भारतावर सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा तापमानात घट होईल आणि उष्णतेची लाट निवळेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try