Skymet weather

[Marathi] पुण्यात मुसळधार पाऊस,एकाचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त झाडे पडली, आज देखील गडगडाटासह पावसाची शक्यता

October 10, 2019 10:54 AM |

Pune rains

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. शिवाय, काल सायंकाळी ६ ते ७:३० च्या दरम्यान मुसळधार पावसाने शहरात हजेरी लावली.

खरं तर, या जोरदार सरींमुळे शहराच्या काही भागात वाहतुकीची कोंडी झाली व पाणी साचले. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागांत एकूण ५० झाडे कोसळली. एका पीएमपीएमएल बसचालकाने सर्व्हिस वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले होते या गाडीवर एक झाड कोसळले ज्यात बसचालकाला आपला जीव गमवावा लागला.

पुणे शहरासाठी सलग पाचवा दिवस आहे ज्यामध्ये शहरात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्रावर असलेले चक्रवाती परिभ्रमण आता कोकण किनारपट्टीला लागून असलेल्या पूर्व अरबी समुद्राकडे सरकले आहे. तसेच, कमी दाबाचा पट्टा कर्नाटक किनारपट्टीपर्यंत विस्तारला आहे.

त्यामुळे पुणे शहरात १३ ऑक्टोबरपर्यंत ठिकठिकाणी पाऊस सुरू राहील. शिवाय ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी पुणे शहरात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस लागून राहणार नसून फक्त अल्प कालावधीसाठी असेल.

आज पुण्यात दुपारनंतर किंवा संध्याकाळी गडगडाटासह पावसाची शक्यता असून उद्या आणि परवा पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर, पाऊस ओसरण्यास सुरवात होईल.

Image Credits – DNA India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather







For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories






latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×