Skymet weather

[Marathi] कमी दाबाचा पट्टा देणार महाराष्ट्रात चांगला पाऊस, दक्षिण कोंकणात मॉन्सूनचे आगमन

June 20, 2019 11:16 AM |

rain in Maharashtra

महाराष्ट्रात पावसाची तीव्रता पुन्हा एकदा वाढली आहे. गेल्या २४ तासात, दक्षिण कोंकण व गोव्या मध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडलेला आहे, ज्यामुळे येथे मॉन्सूनचे आगमन झाले आहे.

दुसरीकडे, अंतर्गत भागांवर विशेषत: मध्य महाराष्ट्रवर हलका ते मध्यम पाऊस पडलेला आहे.

गेल्या २४ तासात, वेंगुर्ला मध्ये ९६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. त्यांनतर, रत्नागिरी मध्ये ९२ मिलीमीटर, महाबळेश्वर मध्ये २१ मिलीमीटर आणि कोल्हापूर मध्ये ९ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, एक कमी दाबाचा पट्टा लवकरच ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागांवर विकसित होण्याची अपेक्षा आहे. प्रभावाने येणाऱ्या २४ ते ४८ तासात, दक्षिण कोकण आणि गोव्या मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्या मध्ये हलक्या ते मध्यम स्वररूपाच्या पावसाची अपेक्षा आहे.

पुढे, २१ जून दरम्यान, विदर्भातील आणि मराठवाड्यातील भागात पावसाची तीव्रता आणखी वाढेल, तर दक्षिण कोकण आणि गोव्या मध्ये पावसाची तीव्रता वाढलेली असून मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

२३ जून रोजी, पावसाची तीव्रता मध्य महाराष्ट्रात वाढणे अपेक्षित आहे. या कालावधीत, एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस पण पडणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातील अंतर्गत भागात पावसाची तीव्रता वाढण्याचे कारण आहे दक्षिण पश्चिम दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बनलेला कॉन्फ्लुएन्स झोन.

उलट, मुंबईसह उत्तर कोकण आणि गोव्याच्या भागात चांगला पाऊस अनुभवण्यासाठी काही वेळ वाट पहावी लागेल, तथापि, येथे हलका पाऊस सुरु राहील.

याशिवाय, दक्षिण कोकण आणि गोवा क्षेत्रावरील पावसाच्या क्रियाकलापांच्या वाढीमुळे, येथे मॉन्सूनचे आगमन झाले आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यातील काही भाग देखील मॉन्सूनचा पाऊस अनुभवतील. पुढे, २५ किंवा २६ जून दरम्यान मॉन्सून मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये प्रवेश करणे अपेक्षित आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try