Skymet weather

[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट, जतिन सिंग: विश्रांतीनंतर मान्सूनचे जोरदार पुनरागमन, जवळपास संपूर्ण देशभरात पाऊस, मुंबईत देखील पाऊस वाढणार

July 22, 2019 2:21 PM |

Monsoon in India

मान्सून ची विश्रांती संपली असून केरळ मध्ये झालेल्या जोरदार पावसाने मान्सूनच्या पुनरागमनाची चाहूल लागली आहे. पुढील २४ तासांत देशातील काही भागांत पाऊस सुरू होईल ज्यायोगे सक्रिय मान्सूनची स्थिती निर्माण होईल. महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजेच पुढील १० दिवस थोड्या अंतराने पावसाच्या सरी पडतील.

या कालावधीत संपूर्ण देशात हलका ते मध्यम पाऊस पडेल,तसेच काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. राजस्थान मध्ये अजूनपर्यंत पाऊस झाला नसून तेथेही काही पावसाळी गतिविधी दिसून येतील. मान्सूनच्या उत्तर सीमेने (एनएलएम) शुक्रवारी (१९ जुलै रोजी) देशाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यात प्रगती केली आहे, जे स्पष्टपणे दर्शविते की दक्षिणपश्चिम मान्सून पुन्हा एकदा सक्रिय टप्प्यात प्रवेश करत आहे.

NLM

देशातील १ जून ते २२ जुलैपर्यंत असलेली पावसाची १८ टक्क्यांची कमतरता कमी करण्यासाठी हा पाऊस अत्यंत उपयोगी ठरेल जे खूप महत्त्वपूर्ण आहे. मान्सूनच्या विश्रांतीच्या काळात देशात कमी पाऊस पडला. आतापर्यंत (१ जून ते २० जुलै दरम्यान) ३५६.८ मिमीच्या तुलनेत देशात २९१.३ मिमी पाऊस झाला आहे. या (मान्सूनच्या विश्रांती काळात) सर्वात वाईट प्रभावित क्षेत्र मध्य भारत आहे जेथे १४ जुलै रोजी ६% वरून ही उणीव १९% पर्यंत वाढली आहे. देशातील तुलनात्मक उप-विभागानुसार पावसाची कमतरता खालील प्रमाणे आहे.

RAINFALL

जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाल्याने देशभरातील पावसाची कमतरता (१ जून ते १३ जुलै दरम्यान) ३० जून रोजी ३३% वरुन १२% पर्यंत खाली आली. परंतु १४ जुलैपासून मान्सूनने विश्रांती घेतल्याने हि उणीव १८% पर्यंत वाढली आहे.

केवळ जुलै बद्दल बोलायचे झाल्यास या महिन्यातील तूट जास्त नाही. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार सध्या जुलैमध्ये केवळ २% पावसाची तूट आहे, जी येणाऱ्या पावसामुळे निश्चितच सुधारेल.

पुढील १० दिवसात, दक्षिणपश्चिम मॉन्सूनमुळे देशाच्या बहुतेक भागांत चांगला पाऊस होईल. राजस्थान, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे.

बिहारमध्ये पूराचा धोका, पिकांचे नुकसान संभाव्य

२२ ते २५ जुलै दरम्यान बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम चंपारण पासून किशनगंज आणि पूर्णिया पर्यंत संपूर्ण उत्तर बिहारमध्ये या काळात तीव्र ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तर बिहारमधील सिवान, गोपालगंज, छपरा, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण आणि सीतामढी या जिल्ह्यात आधीच पुराची स्थिती आहे. या भागातील भात, मका, तीळ, तूर आणि उडीद हि पिके अति पावसामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. अजून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे या भागांतील परिस्थिती अजून भीषण होण्याची
शक्यता आहे.

दुसरीकडे,दक्षिण बिहारमधील भोजपुर, रोहतस, गया, औरंगाबाद आणि नवादा या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असून शेतीला पाण्याची खूप गरज आहे. त्यामुळे या भागांसाठी पाऊस वरदान ठरणार आहे.

उत्तर-पूर्व भारतात देखील चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम राज्यामध्ये या कालावधीत जोरदार पाऊस नोंदला जाऊ शकतो. राज्याच्या काही भागांत अतितीव्र पाऊस पडू शकतो. म्हणून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढणार

पुढील दहा दिवसांत चक्रवाती परिभ्रमण आणि ट्रफ रेषा यांसारख्या दोन हवामान प्रणाली तयार होणार आहेत. संपूर्ण देशाला पाऊस देण्यात या हवामान प्रणाली अत्यंत महत्वपूर्ण ठरतील.

सध्या मुंबईत काही ठिकाणांपुरता मर्यादित असलेला पाऊस शहरभर बरसेल तसेच पावसाच्या तीव्रतेत थोडी वाढ होईल. मुंबईकरांनो २५ जुलै नंतर चांगल्या पावसासाठी तयार राहा.

प्रतिमा क्रेडीट: अल जज़ीरा

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try