Skymet weather

MD Skymet, Jatin Singh: पश्चिमी विक्षोभामुळे उत्तरेकडील डोंगररांगांतील हवामान प्रभावित होणार, गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात किमान तापमान एक अंकी नोंद होण्याची शक्यता, पूर्व आणि ईशान्य भारतात अवकाळी पाऊस

January 20, 2020 1:50 PM |

western disturbance

स्कायमेटच्या अचूक अंदाजानुसार, मागील आठवड्यात उत्तर भारतात पावसाळी गतिविधी अनुभवण्यात आल्या. बुंदेलखंड आणि पूर्व मध्य प्रदेशात मध्यम ते मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी गडगडाटासह पावसाळी गतिविधी नोंदवल्या गेल्या. दिल्ली एनसीआरने यापूर्वीच मासिक पावसाचा आकडा पार केला आहे.

महिन्याच्या पूर्वार्धातच, लखनऊ मध्ये जानेवारी महिन्यातील सर्वाधिक पावसाचा विक्रम नोंदविला आहे. सौराष्ट्र आणि कच्छ येथेही १२ तारखेला अवकाळी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी मुंबईने ११.४ अंश सेल्सियस किमान तापमानासह हंगामातील सर्वात थंडी असलेली रात्र नोंदविली.

मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागात थंडीची लाट सदृश्य परिस्थिती असून, पुणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर आणि औरंगाबाद येथे एक अंकी किमान तापमान नोंदवले गेले. पूर्व आणि मध्य भारतामध्ये तुरळक हवामान विषयक गतिविधी अनुभवण्यात आल्या.

उत्तरेकडील डोंगररांगांत हवामान गतिविधी, पूर्व आणि ईशान्य भारतात अवकाळी पाऊस

उत्तर भारतातील डोंगररांगां आणि पायथ्याकडील भाग पश्चिमी विक्षोभामुळे २०, २१ आणि २२ रोजी प्रभावित होतील. आणखी एक पश्चिमी विक्षोभ, जो २६ जानेवारीच्या सुमारास विकसित होईल परिणामी आठवड्याच्या उत्तरार्धात उत्तरेकडील पर्वतरांगावरील हवामान प्रभावित होईल. तसेच, थंडीची लाट उत्तर भारतावर पकड घेईल ज्यामुळे वारे वाहतील, पहाटे धुके असेल आणि किमान तापमानात घट होईल.

या आठवड्यात मध्य भारतात चांगले हवामान राहील. पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडमध्ये २१ व २२ रोजी तुरळक अवकाळी विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक अंकी किमान तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये २०, २१ आणि २२ तारखेस गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमानात किंचित घट अपेक्षित असली तरी, आठवड्याच्या उत्तरार्धात या भागामध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण हवामान विषयक गतिविधी नोंदविली जाणार नाही.

तामिळनाडूच्या दक्षिणेकडील व किनारपट्टीवरील भागात आठवड्याच्या पूर्वार्धात हलका पाऊस पडेल. उर्वरित द्वीपकल्पात हवामानात कोणतेही लक्षणीय बदल अपेक्षित नाही. चेन्नईत कोरडे हवामानाच्या स्थितीसह किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदले जाईल.

दिल्ली एनसीआर मध्ये पहाटे धुके व दुपारी आल्हादायक वातावरण

येत्या आठवड्यात दिल्ली एनसीआरसाठी पहाटे धुके आणि दुपारी सूर्यप्रकाश असेलेली असेल. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जरी सकाळी थंडी व वारा असला तरी हवामान खराब होण्याची अपेक्षा नाही.

Image Credits – The Weather Channel 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try