[Marathi] पुढील काही दिवस पुणे व नाशिक येथे तापमान सामान्यपेक्षा खाली राहणार

January 23, 2020 11:06 AM |

Pune winters

या हंगामात महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत तीन वेळेस थंडी सदृश्य परिस्थिती अनुभवण्यात आली. तापमान सर्वात थंड १६ आणि १८ जानेवारी दरम्यान होते. नाशिक व पुणे या दोन्ही ठिकाणी हंगामातील सर्वात नीचांकी तापमान अनुक्रमे ६ अंश आणि ८.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

त्यानंतर तापमानात मोठे बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त अशी कोणतीही सक्रिय प्रणाली निर्माण झाली नाही. गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातील हवामानही उत्तरेकडील वातावरणावर अवलंबून असते. पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे उत्तरेकडील टेकड्यांमध्ये अलीकडे पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. तथापि, यावेळी उत्तरेकडील मैदानांमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण गतिविधीं झाल्या नाहीत. तसेच मजबूत प्रणालींच्या अभावामुळे महाराष्ट्राचे तापमान गेल्या काही दिवसांपासून स्थिर राहिले आहे.

हवामान अंदाज

कमकुवत पश्चिमी विक्षोभांच्या पार्श्वभूमीवर एक आठवड्यापर्यंत हिमालयातील वातावरण प्रभावित होण्याची अपेक्षा आहे. तथापि, या प्रणालीचा प्रभाव फक्त उत्तरेकडील डोंगररांगांपुरताच मर्यादीत राहू शकतो. त्यामुळे उत्तर भारतातील मैदानी भागांवर गडगडाटी पावसाचा जोर नसेल.

उद्या, वायव्य दिशेने येणारे थंड व जोराचे वारे वायव्य भारतामध्ये जोरदार हजेरी लावण्याची अपेक्षा असून गुजरात आणि महाराष्ट्र यासारख्या मध्य भारतातील काही राज्यांपर्यंत पोहोचू शकतात. ज्यामुळे तापमानात लक्षणीय घट अपेक्षित आहे. खरं तर, पारा मोठ्या भूभागावर तापमान सामान्यपेक्षा खाली स्थिरावू शकते. काही शहरांत एक-अंकी किमान तापमानाची नोंद होऊ शकते.

सामान्यत: गुजरात आणि महाराष्ट्र यासारख्या देशातील मध्य भागात हिवाळ्यातील हवामान प्रणालीच्या आवाक्याबाहेर राहिल्यामुळे तीव्र हिवाळा अनुभवला जात नाही. तसेच महाराष्ट्रातील हवामानशास्त्रीय विभागांमधील हवामानात मोठी तफावत आहे.

दहा जिल्हे असलेला मध्य महाराष्ट्र हा उत्तर-दक्षिण दिशेने विभागलेला विभाग आहे, तो सुमारे ४०० किमी पर्यंत पसरलेला असून रुंदी सुमारे १८० किमी तर १५००-२००० फूट उंचीचा असून पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील बाजूला आहे.

उत्तर आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामानाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलते. उत्तरेकडील भाग (धुळे, अहमदनगर, पुणे आणि नाशिक) हिवाळ्यातील थंडीचा कडाका जाणवतो आणि किमान एक अंकापर्यंत घसरते. दुसरीकडे, दक्षिण मध्य महाराष्ट्र (कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा) कडाक्याच्या थंडीपासून अद्याप दूर राहिलेला आहे.

आधी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचे हवामान उत्तर भारताच्या हवामानाशी जोडलेले आहे. उत्तर भारतात विकसित होणारी हवामान प्रणाली आपला प्रभाव फक्त उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत पाडू शकतात. या विभागातील दक्षिणेकडील भाग व्यापण्यात ह्या प्रणाली अपयशी ठरतात. म्हणूनच, मध्य महाराष्ट्रातील उत्तर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांच्या तापमानात मोठ्या प्रमाणात फरक दिसून येतो.

उदाहरणार्थ, १७ जानेवारी रोजी पुणे आणि नाशिक (उत्तर मध्य महाराष्ट्र) मधील किमान तापमान अनुक्रमे ८.२ अंश आणि ६ अंश नोंदले गेले. जवळपास ७ अंशांच्या तापमानातील फरकासह कोल्हापूर आणि सांगली येथे अनुक्रमे १४.५ आणि १४ अंश सेल्सिअस तापमान होते.

तथापि, जानेवारीत पारा ५ अंशांपेक्षा कमी तापमान गाठणाऱ्या पुणे आणि नाशिकसाठी एक-अंकी किमान तापमान देखील असामान्य नाही.

Image Credits – The Indian Express 

Any information taken from here should be credited to Skymet WeatherFor accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories
Weather on Twitter
जानिए कैसी रहेगी मौसम की चाल, आपके शहर में: #WeatherForecast #Weather t.co/2QysHGkSWh
Monday, February 24 23:01Reply
पूर्व उत्तर प्रदेशात एक दोन ठिकाणी सरी बरसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील बऱ्या… t.co/1dJkaCq5th
Monday, February 24 20:45Reply
Fairly widespread rain is expected to lash Northeast India. Isolated snow in likely in #ArunachalPradesh. These wea… t.co/uknnNrig0o
Monday, February 24 20:30Reply
देश के पूर्वी और मध्य राज्यों में अगले कुछ दिन होगी भारी बारिश। पूर्वोत्तर राज्यों पर भी मौसम मेहरबान। फरवरी में उ… t.co/3PRdRPVwoV
Monday, February 24 20:00Reply
छत्तीसगढ़ के कई इलाकों में अगले 24 घंटो तक जारी रहेंगी तेज बारिश | पूर्वी मध्य प्रदेश में हल्की बारिश की संभावना |… t.co/55ilq7rPMW
Monday, February 24 19:30Reply
24 से 26 फरवरी यानि सोमवार से बुधवार तक विदर्भ के पूर्वी जिलों में हल्की बारिश की संभावना है। 27 और 28 फरवरी यानि… t.co/1NiJqNyb4T
Monday, February 24 19:15Reply
ओड़िशा, झारखंड और गंगीय पश्चिम बंगाल में तेज बारिश के साथ मेघ गर्जना की संभावना, बिहार, पूर्वी उत्तर प्रदेश सहित प… t.co/4lTV8k2gsC
Monday, February 24 19:00Reply
फ़िरोजपुर, भटिंडा और गंगानगर में मेघ गर्जना या हल्की बारिश की संभावना, उत्तराखंड में भी हो सकती है बारिश | दिल्ली,… t.co/P00KM7bRKd
Monday, February 24 18:45Reply
#February has remained large deficient so far and has consumed all the surplus. From February 1 to February 20, the… t.co/ZKEgBMaCyj
Monday, February 24 18:15Reply
#WestBengal: Rain, #hailstorm and lightning likely over Bankura, Barddhaman, Birbhum, Dakshin Dinajpur, Darjiling,… t.co/IbbynTDgna
Monday, February 24 17:34Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try