>  
[Marathi] दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

[Marathi] दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

05:47 PM

website

संपूर्ण राज्यात आतापर्यंत तुलनेने कमी पाऊस पडलेला असून , महाराष्ट्र शासनाने जवळपास 180 तालुक्यात दुष्काळ सदृश घोषित केले आहे.

ऑक्टोबरमध्ये बऱ्यांच भागात सामान्य पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे . दरम्यान मराठवाड्या वर तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली तर

सोलापूरमध्ये गेल्या 24 तासांत हलका पाऊस अनुभवण्यात आला. याउलट मात्र विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दिवसाचे तापमान सामान्य पेक्षा अधिक आहे.

तथापि, दक्षिण कर्नाटक ते उत्तर मध्य महाराष्ट्रा दरम्यान एक कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे, ज्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तसेच येत्या काही दिवसात ,पुण्यासह, दक्षिण कोकण आणि गोवा तसेच उत्तर मध्य-महाराष्ट्रावर तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार मराठवाड्यावर पावसाचा जोर किंचित वाढेल परंतु विदर्भातील हवामान मात्र कोरडे आणि उष्णच राहणार .तसेच 26 ऑक्टोबर पासून पावसाचा जोर पुन्हा ओसरणार.

Image Credits – Wikipedia

Any information taken from here should be credited to Skymet Weather