Skymet weather

[Marathi] स्कायमेटचा २०१९ साठी मॉन्सूनचा विभागवार अंदाज

May 14, 2019 4:20 PM |

स्कायमेट, भारतातील अग्रगण्य हवामान कंपनीने ३ एप्रिल २०१९ रोजी मॉन्सून २०१९ करीत अंदाज जाहीर केलेला असून ह्या हंगामात पाऊस दीर्घकालीन सरासरीपेक्षा ९३% (+/-५% च्या त्रुटीसह) राहणार असे नमूद केले आहे.

संपूर्ण भारताचा अंदाज वर्तवल्यानंतर स्कायमेट आता १४ मे २०१९ रोजी देशाच्या चार भागातील पावसाच्या प्रमाणित वितरणाचा अंदाज जाहीर करत आहे. हा विभागीय अंदाज +/- ८% च्या त्रुटीसह देण्यात येत आहे.

यावर्षी मॉन्सूनचे वेळेवर आगमन होणार आहे. तथापि, हवामान प्रारूपांच्या अनुसार मॉन्सूनचे आगमन कमकुवत असणार असे दिसत आहे, परिणामी यावर्षी मॉन्सून सुरुवात फारशी उत्साहवर्धक नाही.

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांवर मॉन्सूनचे आगमन २२ मे रोजी (+/- २ दिवसांच्या त्रुटीसह) होईल. केरळात नैऋत्य मौसमी पावसाला ४ जून (+/- ४ दिवसांच्या त्रुटीसह) रोजी सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पूर्वोत्तर भारतातील काही भागांचा देखील यात समावेश असेल. याआधी केरळवर पूर्व-मॉन्सूनच्या जोरदार सरींची अपेक्षा आहे.

स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग यांच्या मते "या हंगामात चारही विभागात सामान्य पावसापेक्षा कमी पाऊस पडेल. पूर्व आणि पूर्वोत्तर भारतासह मध्य भारतात, उत्तरपश्चिम भारत आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या तुलनेने पावसाचे प्रमाण कमी असेल. मॉन्सूनचे ४ जून रोजी आगमन होणार आहे, असे दिसते की मॉन्सूनची सुरूवातीची प्रगती मंद होणार आहे".

स्कायमेटच्या मते, मॉन्सूनची जून-सप्टेंबर संभाव्यता अशी आहे:

०% जास्त पावसाची शक्यता (हंगामातील पाऊस सरासरीच्या ११०% किंवा त्यापेक्षा अधिक )

०% सामान्य पेक्षा जास्त पावसाची शक्यता (हंगामातील पाऊस सरासरीच्या १०५ ते ११०%)

३०% सामान्य पावसाची शक्यता (हंगामातील पाऊस सरासरीच्या ९६ ते १०४%)

५५% सामान्य पेक्षा कमी पावसाची शक्यता (हंगामातील पाऊस सरासरीच्या ९० ते ९५%)

१५% दुष्काळाची शक्यता (हंगामातील पाऊस सरासरीच्या ९०% किंवा त्याहून कमी)

प्रादेशिक पातळीवर, पर्जन्यमानाचा अंदाज खालीलप्रमाणे आहे:

Monsoon 2019

 

पूर्व आणि पूर्वोत्तर भारत: दीर्घकालीन सरासरीच्या ९२% (जून ते सप्टेंबर दीर्घकालीन सरासरी= १४३८ मिमी)

मॉन्सूनच्या पावसात पूर्वेकडील आणि पूर्वोत्तर भारताचा सर्वाधिक ३८% वाटा असतो. भौगोलिक बाबतीत म्हणायचे तर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालसाठी धोका जास्त आहे, तर उत्तरपूर्व भारतासाठी तुलनेने कमी आहे. या हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी म्हणजे ९२% पावसाची शक्यता आहे.

५% जास्त पावसाची शक्यता

१०% सामान्य पेक्षा जास्त पावसाची शक्यता

२५% सामान्य पावसाची शक्यता

५०% सामान्य पेक्षा कमी पावसाची शक्यता

१०% दुष्काळाची शक्यता

East and Northeast India

उत्तरपश्चिम भारतः दीर्घकालीन सरासरीच्या ९६% (जून ते सप्टेंबर दीर्घकालीन सरासरी = ६१५ मिमी)

या विभागावर सक्रिय मॉन्सूनचा कालावधी इतर विभागांच्या तुलनेने कमी असतो. हा विभाग देशाच्या एकूण पावसाच्या १७% योगदान देतो. या विभागात  दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ९६% म्हणजेच सामान्य पाऊस होण्याची अपेक्षा आहे. पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि दिल्ली-एनसीआरच्या तुलनेत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ प्रदेशांमध्ये पावसाचे प्रदर्शन चांगले असेल.

१०% जास्त पावसाची शक्यता

१०% सामान्य पेक्षा जास्त पावसाची शक्यता

६०% सामान्य पावसाची शक्यता

१५% सामान्य पेक्षा कमी पावसाची शक्यता

५% दुष्काळाची शक्यता

Northwest India

 

मध्य भारत: दीर्घकालीन सरासरीच्या ९५% (जून ते सप्टेंबर दीर्घकालीन सरासरी = ९७६ मिमी)

 मध्य भारताबद्दल सांगायचे तर ९७६मिमी पावसासह या विभागाचा वाटा २६% आहे. सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पावसाळी हंगाम या विभागात राहण्याची शक्यता असून सरासरीच्या ९१% पाऊस होण्याचा अंदाज आहे. ओडिशा आणि छत्तीसगढ चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये तुलनेने कमी पाऊस असेल.

५% जास्त पावसाची शक्यता

५% सामान्य पेक्षा जास्त पावसाची शक्यता

२०% सामान्य पावसाची शक्यता

५०% सामान्य पेक्षा कमी पावसाची शक्यता

२०% दुष्काळाची शक्यता

दक्षिण द्वीपकल्प: दीर्घकालीन सरासरीच्या ९५% (जून ते सप्टेंबर दीर्घकालीन सरासरी = ७१६ मिमी)

दक्षिण द्वीपकल्पात या हंगामात कमी धोका असून सामान्यपेक्षा ९५% पावसाचा अंदाज आहे. या विभागाचा एकूण पावसाच्या १९% वाटा असून सर्वसाधारणपणे  पावसाचे प्रमाण ७१६ मिमी इतके असते. उत्तर-कर्नाटक आणि रायलसीमामध्ये कमी पाऊस होण्याची शक्यता असून केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे.

५% जास्त पावसाची शक्यता

१०% सामान्य पेक्षा जास्त पावसाची शक्यता

६०% सामान्य पावसाची शक्यता

१५% सामान्य पेक्षा कमी पावसाची शक्यता

१०% दुष्काळाची शक्यता

South India

Image Credit: Wikipedia

Please Note: Any information picked from here must be attributed to skymetweather.com


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
RT @SkymetHindi: मॉनसून 2019: सम्पूर्ण भारत का 24 जुलाई का मॉनसून पूर्वानुमान #hindi #weather #weatheralert #weaherforecast #Hindinews #Mon
Tuesday, July 23 19:44Reply
RT @SkymetHindi: मॉनसून 2019 लाइव अपडेट: पूर्वोत्तर भारत, बिहार और उत्तर प्रदेश में अगले 24 घंटों में भारी बारिश के आसार #hindi #Hindinews
Tuesday, July 23 19:44Reply
RT @SkymetHindi: बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल में छाए हैं बारिश वाले बादल #hindi #hindiupdate #Hindinews #Monsoon2019 #monsoo
Tuesday, July 23 19:44Reply
RT @_svagarwal: Twin rainbow in the skies of Thane. Video from a dear friend. @SkymetWeather t.co/C2suH1Eqos
Tuesday, July 23 19:38Reply
Active to Vigorous #Monsoon conditions are likely over parts of #Assam, #Meghalaya, Sub-Himalayan #WestBengal and S… t.co/C1YR01OwrY
Tuesday, July 23 19:30Reply
@rknshah Yes, July 28 and 29
Tuesday, July 23 19:23Reply
#Bihar: Tonight onward,# rains will start increasing and moderate to heavy rains will be seen on July 24 and July 2… t.co/oZt9lNSMIb
Tuesday, July 23 19:15Reply
दरम्यान,पुढील २४ तासामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आ… t.co/N2JoHYxLxE
Tuesday, July 23 19:00Reply
Tuesday, July 23 18:57Reply
#Karnataka: For the coming two to three days, moderate showers with isolated heavy #rains will be a sight. t.co/m79y4Jwr05
Tuesday, July 23 18:38Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try