Skymet weather

[Marathi] मुंबईत पावसाचे जोरदार पुनरागमन, मॉन्सूनला लवकरच सुरुवात

June 7, 2018 5:52 PM |

Mumbai rains

मुंबई व आसपासच्या परिसरावर कालपासूनच घनदाट ढगांनी गर्दी केलेली होती, ज्यामुळे गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास पावसाला सुरुवात झालेली असून त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतलेली नाही. दिवसभर मुंबईत पावसाचा जोर कमी अधिक नोंद करण्यात आलेला आहे. परिणामी, दृश्यमानता कमी होऊन ५०० मीटर झाली असून वाऱ्याचा वेग देखील ५० किलोमीटर प्रति तास नोंदवण्यात आलेला आहे.

स्काइमेटच्या अंदाजानुसार, मध्यम ते जोरदार पाऊस पुढील एक ते दोन तास सुरू राहील. त्यानंतर, मात्र  पाऊस थोडा वेळ विश्रांती घेईल पण लवकरच परत सुरुवात होईल. हवामानतज्ञांच्या अनुसार दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच राहील तसेच एक-दोन जोरदार सरी देखील होत राहतील. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मॉन्सून आता कधीही दाखल होण्याची शक्यता आहे.

या पावसाचे श्रेय पश्चिम किनारपट्टीसह कोकण ते तटीय कर्नाटकपर्यंत विस्तारलेली एक ट्रफ रेषेला जाते. ज्यामुळे पुढील २-३ दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

[yuzo_related]

स्काइमेट सांगितल्याप्रमाणे, मुंबईकरांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, विशेषत: पुढील तीन दिवसात म्हणजेच ८-१० जून या कालावधीत शहर परिसरात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या काळात तीन अंकी पावसाची नोंद देखील होवू शकते.

या पावसामुळे मुंबईत सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून पूर सदृश्य परिस्थिती देखील उद्भवू शकते.

Image Credit: The Financial Times

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try